शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

अशेरी गडाची केली युवकांनी सफाई

By admin | Updated: November 16, 2016 04:07 IST

तालुक्यातील शिवतेज ग्रुप आणि विक्र ांत युवा मित्र मंडळ ओंदे यांच्या संयुक्त विद्यमानाने २२ सदस्यांनी पालघर जिल्ह्यातील एैतिहासिक अशा आशेरी

संजय नेवे/ विक्रमगडतालुक्यातील शिवतेज ग्रुप आणि विक्र ांत युवा मित्र मंडळ ओंदे यांच्या संयुक्त विद्यमानाने २२ सदस्यांनी पालघर जिल्ह्यातील एैतिहासिक अशा आशेरी गडावर चढाई करून तेथील अशेरीदेवीच्या मंदिर परीसराची सफाई केली. तसेच किल्ल्याच्या अवतीभावती पडलेला कचरा-प्लास्टिक गोळा करून तो नष्ट केला. तसेच पुरातन अशा दोन तलावां भोवती वाढलेले गवत काढून टाकले. किल्ल्यावर मद्यपान करून ज्या बाटल्या अवास्तव टाकल्या होत्या त्याही गोळा केल्या. तसेच किल्ल्यावर असलेल्या तीन पंचधातूच्या तोफा या अस्ताव्यस्त पडल्या होत्या. त्या नीट रचून किल्ले संवर्धनाचा संदेश दिला. आता येथे येणाऱ्या पर्यटकांनी ही स्वच्छता कायम राखावी, अशी स्थानिकांची अपेक्षा आहे. किल्ल्याची दुरावस्था : मात्र या एैतिहासिक किल्ल्याची दुरावस्था झाली असून त्याची मोठ्या प्रमाणात पडझड झालेली आहे. या किल्ल्याचे बुरु ज-भिंती पूर्णपणे कोसळल्या आहेत. या किल्ल्यावर आजही अखंड दगडामध्ये कोरलेली ४ ते ६ पाण्याची कुंडे असून किल्ल्याच्या मध्यभागी मोठी दोन तळी व कोरलेल्या पायऱ्या, कोरीव काम आजही अस्तित्वात आहे. गडाचे कोरीव प्रवेशद्वार भग्न अवस्थेत असूनही आजही येणाऱ्या शिवप्रेमींचे स्वागत करीत आहे. अशेरी किल्ल्याला ऐतिहासिक महत्त्व असून येथे आजही 3 पंचधातुच्या तोफा असून त्या इतरत्र पडलेल्या आहेत. कधीही त्या चोरून नेण्याचा धोका आहे. तसेच किल्ल्याची पूर्णपणे पडझड झाली आहे. या तोफांच्या तसेच किल्ल्याच्या संरक्षणासाठी प्रशासनाने तसेच पुरातन विभागाने याकडे लक्ष द्यावे यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. त्याच प्रमाणे दुर्लक्षित अशा दोन किल्ल्याची आम्ही दरवर्षी साफसफाई करुन शासनाने याकडे लक्ष देण्यासाठी निवेदने देऊन पाठपुरावा करणार आहोत. -अमोल सांबरे, सदस्य-शिवतेज ग्रुपभोज राजाच्या कारकीर्दीत बांधलेल्या या किल्ल्याची खूपच दयनिय अवस्था झाली आहे. तसेच पुरातन भिंती, बुरुज ढासळलेल्या अवस्थेत आहेत. पुरातन विभागाने तसेच शासनाने या किल्ल्याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.- अतुल पाटील, शिवप्रेमी, शिव इतिहास अभ्यासक