नोकरी नसल्याच्या नैराश्यातून तरुणाची अ‍ॅसिड पिऊन आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2020 01:31 IST2020-08-02T01:31:20+5:302020-08-02T01:31:32+5:30

नालासोपारा पूर्वेकडील नालेश्वर नगरमधील ओम साई निवास इमारतीमध्ये राहणाºया अतहर अली अनवर अली अन्सारी (२५) याने नोकरी नसल्याच्या नैराश्यातून १२ जुलैला रात्री ३ वाजण्याच्या सुमारास घरातील टॉयलेट साफ करण्याचे अ‍ॅसिड प्राशन केले.

Young man commits suicide by drinking acid out of frustration of not having a job | नोकरी नसल्याच्या नैराश्यातून तरुणाची अ‍ॅसिड पिऊन आत्महत्या

नोकरी नसल्याच्या नैराश्यातून तरुणाची अ‍ॅसिड पिऊन आत्महत्या

नालासोपारा : पूर्वेकडील परिसरात राहणाऱ्या २५ वर्षीय तरुणाने नोकरी नसल्याच्या नैराश्यातून घरातील टॉयलेट साफ करण्याचे अ‍ॅसिड पिऊन आत्महत्या केली आहे. मुंबईच्या सायन रुग्णालयातून कागदपत्रे आल्यावर तुळींज पोलिसांनी शुक्रवारी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

नालासोपारा पूर्वेकडील नालेश्वर नगरमधील ओम साई निवास इमारतीमध्ये राहणाºया अतहर अली अनवर अली अन्सारी (२५) याने नोकरी नसल्याच्या नैराश्यातून १२ जुलैला रात्री ३ वाजण्याच्या सुमारास घरातील टॉयलेट साफ करण्याचे अ‍ॅसिड प्राशन केले. त्याला घरच्यांनी उपचारासाठी अलायन्स हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्याची स्थिती नाजूक झाल्यावर १२ जुलैला मुंबईच्या नायर रुग्णालयात पाठवण्यात आले. उपचारादरम्यान
२१ जुलैला त्याचा मृत्यू झाला. हॉस्पिटलमधून कागदपत्रे आल्यावर शुक्रवारी तुळिंज पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

Web Title: Young man commits suicide by drinking acid out of frustration of not having a job