शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
3
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
4
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
5
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
6
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
7
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
8
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
9
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
10
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
11
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
12
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
13
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
14
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
15
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
16
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
17
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
18
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
19
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
20
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
Daily Top 2Weekly Top 5

कामगार रुग्णालय पालिकेने चालवावे

By admin | Updated: June 29, 2017 02:50 IST

ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयाचा विस्तार करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याने त्याचा तात्पुरता कारभार वागळे इस्टेट येथील कामगार रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयाचा विस्तार करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याने त्याचा तात्पुरता कारभार वागळे इस्टेट येथील कामगार रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु, सिव्हिलपेक्षाही कामगार रुग्णालयाची अवस्था दयनीय असल्याने येथे रुग्णांना कितपत चांगले उपचार मिळतील, हे सांगणे कठीण आहे. यामुळे हे रुग्णालय महापालिकेने चालवावे आणि त्यास ऊर्जितावस्था प्राप्त करून द्यावी, अशी मागणी आता स्वराज्य इंडियाने केली आहे. कित्येक वर्षे जुन्या असलेल्या कामगार रुग्णालयात सुमारे ५०० च्या आसपास खाटा आहेत. परंतु, त्याची अवस्था सध्या दयनीय झाली आहे. रुग्णांना उपचार वेळेवर मिळण्यापासून त्याची डागडुजी करण्यापर्यंतचे विषय ऐरणीवर आहेत. असे असताना आता जिल्हा शासकीय रुग्णालयाचे विस्तारीकरण करण्यात येणार असल्याने त्याचा कारभार काही महिने कामगार रुग्णालयातून हाकला जाणार आहे. त्यानुसार, त्याची पाहणीदेखील आरोग्यमंत्र्यांनी काही दिवसांपूर्वीच केली असून डागडुजी करूनच सिव्हिल रुग्णालयाचा कारभार येथे हलवण्यात यावा, असे आदेश त्यांनी दिले आहेत.परंतु, या रुग्णालयाची झालेली अवस्था पाहता, त्या ठिकाणी उपचार कितपत योग्य मिळू शकतात, याबाबत साशंकता आहे. त्यात हे रुग्णालय कामगारांना व त्यांच्या कुटुंबीयांना आरोग्यसेवा मिळेल, या उद्देशाने बांधण्यात आले होते. परंतु, हे हॉस्पिटल ज्या कामगार राज्य विमा योजनेचा भाग होते, तेच आज नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. शहराची लोकसंख्या आज झपाट्याने वाढत आहे. त्यातही असंघटित व असुरक्षित महिला व पुरुष कामगारांची, छोटे व्यवसाय करणाऱ्यांची संख्या सतत वाढत आहे. त्यांच्या आरोग्यविषयक गरजा पूर्ण करण्याकरिता सिव्हिल रुग्णालय आणि छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय अपुरे पडत आहे. त्यामुळे कामगार रुग्णालयाला नवा साज देण्याची गरज असून ते पालिकेने चालवण्यासाठी घ्यावे, अशी स्वराज्य इंडियाची मागणी आहे.