शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

शहरात राजकीय समीकरण बदलणार?, खासदार श्रीकांत शिंदे यांची 'कलानी महल'ला भेट!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2020 5:00 PM

Ulhasnagar : उल्हासनगर महापालिकेत भाजपाचे बहुमत असून त्यांचे वर्चस्व संपविण्यासाठी शहर शिवसेनेने कंबर कसली.

ठळक मुद्देमहापालिकेत भाजपाचे बहुमत असताना ओमी कलानी टीम समर्थक नगरसेवकांच्या बंडखोरी मुळे भाजपाची सत्ता जाऊन शिवसेना आघाडी सत्तेत आली.

- सदानंद नाईक 

उल्हासनगर : शहरातील राजकीय केंद्र बनलेल्या कलानी महलला खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासह शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, उपशहरप्रमुख अरुण अशान आदींनी सदिच्छा भेट देऊन ज्योती कलानी, ओमी कलानी यांच्या सोबत चर्चा केली. या भेटीने राजकीय आराखडे बांधले जात असून दुसरीकडे टीकाही होत आहे. 

उल्हासनगर महापालिकेत भाजपाचे बहुमत असून त्यांचे वर्चस्व संपविण्यासाठी शहर शिवसेनेने कंबर कसली. महापौर निवडणुकी पूर्वी भाजपातील ओमी कलानी टीम समर्थक १० नगरसेवकांना शिवसेनेने फोडून महापौर पदी शिवसेनेच्या लिलाबाई अशान यांना निवडून आणले आहे. यावेळी ओमी कलानी यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली असून ओमी टीम समर्थक १० नगरसेवकांनी भाजपाच्या अध्यादेशाला केराची टोपली दाखविली. 

महापौरपदी शिवसेनेच्या लिलाबाई अशान, उपमहापौर पदी रिपाइंचे भगवान भालेराव निवडून आल्यानंतर, स्थायी समिती सभापती निवडणुकीत भाजपाच्या बंडखोर सदस्याला सूचक, अनुमोदक देऊन सभापतीपदी निवडून आणले. तेव्हापासून ओमी टीमचा शहर शिवसेने सोबत घरोबा वाढल्याचे चित्र शहरात निर्माण झाले. यातूनच पुढे महापालिका सत्ता अबाधित राखण्यासाठी खासदार श्रीकांत शिंदे यांनी कलानी महलला भेट देऊन ओमी कलानी, ज्योती कलानी व कलानी समर्थकांसोबत चर्चा केल्याचे बोलले जात आहे. 

शहरातील राजकारणात कलानी कुटुंबाचे वर्चस्व राहिले असून पप्पू कलानी २० तर ज्योती कलानी ५ असे एकून २५ वर्ष आमदारपद कलानी कुटुंबात राहिले आहेत. तसेच ज्योती व पंचम कलानी महापौरपदी राहिल्या असून ज्योती कलानी सलग ७ वर्ष स्थायी समिती सभापतीपदी होत्या. तसेच, शहराचे नगराध्यक्षपदही कलानी कुटुंबांनी भूषविले आहे. गेल्या महापालिका निवडणुकीपूर्वी ओमी कलानी यांनी ओमी टीमची स्थापना केली असून भाजप सोबत महाआघाडी केली. 

ओमी टीमचे समर्थक उमेदवारांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढविली. ओमी टीमच्या पाठिंब्यामुळे कधी नव्हेतर भाजपाचे ३२ नगरसेवक निवडून आले. मात्र सत्तेसाठी स्थानिक साई पक्षाची मदत घेऊन भाजपचा महापौर तर साई पक्षाचा उपमहापौर निवडून आले. विधानसभा निवडणुकीत कलानी कुटुंबाला उमेदवारी न दिल्याने भाजप व ओमी कलानी टीम मध्ये वाद झाला असून सध्या ते शिवसेने सोबत असल्याचे भासवित आहेत. 

महापालिका सत्तेसाठी शिवसेना कलानी दरबारी? महापालिकेत भाजपाचे बहुमत असताना ओमी कलानी टीम समर्थक नगरसेवकांच्या बंडखोरी मुळे भाजपाची सत्ता जाऊन शिवसेना आघाडी सत्तेत आली. यापुढेही महापालिकेतील सत्ता अबाधित राखण्यासाठी शिवसेना नेते व खासदार कलानी दरबारी ओमी कलानी व ज्योती कलानी यांच्या सदिच्छा भेटीसाठी गेल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरBJPभाजपाShiv SenaशिवसेनाShrikant Shindeश्रीकांत शिंदे