शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
3
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
4
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
5
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
6
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
7
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
8
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
9
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
10
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
11
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
12
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
13
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
15
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
16
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
17
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
18
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
19
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
20
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
Daily Top 2Weekly Top 5

समंत्रक हवेत कशाला?

By admin | Updated: November 9, 2016 03:39 IST

घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पांतर्गत प्रस्तावित असलेल्या तांत्रिक कामांसाठी तज्ज्ञ समंत्रकाची नियुक्ती करण्यास स्थायीच्या सर्व सदस्यांनी विरोध दर्शविला

कल्याण : घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पांतर्गत प्रस्तावित असलेल्या तांत्रिक कामांसाठी तज्ज्ञ समंत्रकाची नियुक्ती करण्यास स्थायीच्या सर्व सदस्यांनी विरोध दर्शविला. महापालिकेकडे अभियंते असताना समंत्रक नेमायचे कशाला, असा सवाल त्यांनी प्रशासनाला केला. यावर समंत्रकाची माहिती पुढील सभेत सादर करा, असे आदेश देताना संमत्रक नेमण्याच्या प्रस्तावाला स्थगिती देत असल्याचे सभापती संदीप गायकर यांनी स्पष्ट केले. स्वच्छ भारत अभियानांतर्गत सरकारकडे सादर केलेल्या प्रकल्प अहवालाची अंमलबजावणी करण्यासाठी अनुभवी व्यक्तीची आवश्यकता आहे. या प्रकल्पांतर्गत आधारवाडी डम्पिंग बंद करणे, शास्त्रोक्त पद्धतीने भरावभूमी प्रकल्प राबविणे, बायोगॅस प्रकल्प कार्यान्वित करणे, दैनंदिन निगा राखणे आदी कामे करायची आहेत. त्यामुळे या तांत्रिक कामांसाठी तज्ज्ञ समंत्रकाची नियक्ती करण्यास मान्यता देण्याचा प्रस्ताव प्रशासनाने मंगळवारच्या स्थायी समितीच्या सभेत दाखल केला होता. या कामासाठी महापालिका एक कोटी ८९ लाख रुपये खर्च करणार आहे. एवढी रक्कम समंत्रकावर खर्च करण्यापेक्षा आपल्या अभियंत्यांना हे काम द्या, असा सूर सदस्यांनी आवळला. यापूर्वीही समंत्रक नेमले आहेत. ते काय करतात? असाही सवाल केला. घनकचरा व्यवस्थापनाचे काम निकडीचे असल्याने सदस्यांनी समंत्रक नेमण्यास मान्यता द्यावी, असे मत कार्यकारी अभियंता घनश्याम नवांगुळ यांनी व्यक्त केले. दरम्यान, समंत्रकाची माहिती सभागृहाला द्यावी, त्यानंतरच प्रस्तावाबाबत निर्णय घेतला जाईल, ही सदस्यांची भावना लक्षात घेता गायकर यांनी तुर्तास प्रस्तावाला स्थगिती देत असल्याचे जाहीर केले.