पोलिसांना आदेश देणारी ‘ती’ व्यक्ती कोण ?- आव्हाड

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2022 12:20 IST2022-11-23T12:19:47+5:302022-11-23T12:20:20+5:30

उद्या या गुन्ह्यांविरुद्ध जेव्हा मी कोर्टात जाईन, तेव्हा त्याचा नाहक त्रास हा त्या पोलिस ठाण्याच्या तपास अधिकाऱ्यांना होईल. त्या पोलिस अधिकाऱ्यांना आदेश देणारी ती व्यक्ती कोण, असा सवाल आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला.  

Who is that person who ordered the police ask jitendra Awad | पोलिसांना आदेश देणारी ‘ती’ व्यक्ती कोण ?- आव्हाड

पोलिसांना आदेश देणारी ‘ती’ व्यक्ती कोण ?- आव्हाड

ठाणे  : माझ्यावर राजकीय दबावापोटी मागील आठवड्यात ७२ तासांत दोन खोटे गुन्हे दाखल करण्यात आले. उद्या या गुन्ह्यांविरुद्ध जेव्हा मी कोर्टात जाईन, तेव्हा त्याचा नाहक त्रास हा त्या पोलिस ठाण्याच्या तपास अधिकाऱ्यांना होईल. त्या पोलिस अधिकाऱ्यांना आदेश देणारी ती व्यक्ती कोण, असा सवाल आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला.  

वरिष्ठ अधिकाऱ्यांचा दोष काय असा प्रश्न उपस्थित करत या अधिकाऱ्यांना ठाण्यात आदेश कोण देते, हे महाराष्ट्राला माहीत असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. वरिष्ठ अधिकारी जसे निर्देश देतात, तसे ते कागदपत्रे बनवतात. म्हणजे हा गरीब बिचारा मारला जाईल आणि वरचे अधिकारी हात वर करून मोकळे होतील, असेही त्यांनी म्हटले आहे.

Web Title: Who is that person who ordered the police ask jitendra Awad