शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेच्या पोतडीत आणखी काय असेल?

By admin | Updated: January 24, 2017 05:45 IST

मुंबईत युती होण्याची वाट न पाहता शिवसेनेने वचननामा प्रसिध्द केल्याने ठाण्याच्या युतीतही ठिणगी पडली आहे. येथेही शिवसेनेने

ठाणे : मुंबईत युती होण्याची वाट न पाहता शिवसेनेने वचननामा प्रसिध्द केल्याने ठाण्याच्या युतीतही ठिणगी पडली आहे. येथेही शिवसेनेने ‘एकला चलो रे’ चा नारा देत, लवकरच ठाण्याच्या मेकओव्हरचा वचननामा प्रसिद्ध करण्याची तयारी सुरू केली आहे. आधीच मालमत्ता करमाफी, शाई धरण पूर्ण करणे, मोफत आरोग्यसेवा, सेंट्रल पार्क या पलीकडे शिवसेनेच्या पोतडीत आणखी काय असेल, हे लवकरच स्पष्ट होईल. शिवसेनेतील एकंदरीत हालचाली पाहता भाजपाला वगळून पक्षाने पावले टाकण्यास सुरुवात केल्याचे दिसून येते.मुंबईत युतीबाबतची बोलणी सुरु असून तीन बैठकानंतरही भाजपा १४४ जागांवर ठाम आहे. परंतु शिवसेनाही भाजपाला जादा जागा सोडण्यास तयार नसल्याने युतीत बिघाडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अशातच, ठाण्यातही शिवसेनेने ‘एकला चलो रे’ चा नारा देत त्यानुसारच स्वत:चा वचननामा तयार केला आहे. प्रत्यक्षात तो जरी अजून प्रसिद्ध झाला नसला, तरी आता मुंबईपाठोपाठ शिवसेनेने ठाण्यातही वेगळे होण्याची तयारी सुरु केल्याचे दिसते. मुंबईत रविवारी पत्रकार परिषद घेऊन शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी मुंबईच्या धर्तीवर ठाणे आणि उल्हासनगरलाही ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता करात सवलत देण्याची घोषणा केली. तसेच, आरोग्य सुरक्षाकवच योजनाही जाहीर केली. याशिवाय पारसिक चौपाटी, सेंट्रल पार्क, जलवाहतुक आदी मुद्यांना देखील त्यांनी हात घातला. याचाच अर्थ शिवसेनेने ठाण्यातही मुंबईच्या धर्तीवर युती न करता स्वबळाचा पर्याय हाती घेण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. शिवसेना जाहीर करीत असलेल्या काही प्रकल्पांना नवा मुलामा चढवण्यात आला आहे. यातील काही प्रकल्प पालिकेचे, काही राज्य आणि केंद्राच्या सहकार्याने होणार आहेत. त्याचे श्रेय भाजपाने घेऊ नये म्हणूनच शिवसेनेने लगीनघाई केल्याचे बोलले जाते. (प्रतिनिधी)