शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम रेल्वेने पुन्हा एकदा पुसली तोंडाला पाने

By admin | Updated: May 16, 2017 00:03 IST

पश्चिम रेल्वेने अनेक रेल्वे स्थानकांच्या नावासह कारभारात अनेकदा मागणी करूनही मराठी भाषेला प्राधान्य न दिल्याने मराठी एकीकरण समितीने पश्चिम विभागीय अतिरिक्त व्यवस्थापकांना नोटीस बजावली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कभार्इंदर : पश्चिम रेल्वेने अनेक रेल्वे स्थानकांच्या नावासह कारभारात अनेकदा मागणी करूनही मराठी भाषेला प्राधान्य न दिल्याने मराठी एकीकरण समितीने पश्चिम विभागीय अतिरिक्त व्यवस्थापकांना नोटीस बजावली आहे. पश्चिम रेल्वेकडे अनेकदा पाठपुरावा केला. विभागीय व्यवस्थापक नुकूल जैन यांची भेट घेतल्यानंतरही मराठी भाषेला प्राधान्य मिळत नसल्याने समितीने मुंबई सेंट्रल येथे पश्चिम रेल्वेच्या विभागीय कार्यालय परिसरात आंदोलन छेडले. यानंतरही रेल्वे प्रशासनाला जाग न आल्याने त्यांनी मराठी भाषेला सापत्न वागणूक देण्याचा प्रकार सुरूच ठेवला आहे. त्यात भार्इंदर रेल्वे स्थानकाला भायंदर असे नाव दिले आहे. ही बाब सामान्य प्रवाशांच्या उच्चारात संभ्रम निर्माण करणारी तसेच मराठीला दुय्यम स्थान देणारी आहे. त्यातच उद्घोषणा, माहिती फलक, तिकिटामागील सूचनांमधून मराठी भाषेला हद्दपार केले असून इतर राज्यांतील प्रादेशिक भाषांना मात्र रेल्वे प्रशासनाकडून प्राधान्य दिले जाते. पश्चिम रेल्वेने त्रिभाषा सूत्रानुसार मराठी भाषेला प्राधान्य देणे अपेक्षित असतानाही तिला सापत्न वागणूक देणे सुरूच ठेवले आहे. काही अमराठी अधिकाऱ्यांच्या मुजोर कारभारामुळेच मराठी भाषेची गळचेपी होत असताना वरिष्ठ अधिकारी मात्र मूग गिळून बसले आहेत. त्यातच राज्य सरकारने मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा दिला असतानाही रेल्वेकडून भाषा अधिनियमाची पायमल्ली केली जात आहे. मराठी भाषेला प्राधान्य देण्यासह कारभारात मराठीचा समावेश करण्यासाठी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी विभागीय व्यवस्थापकांची काही दिवसांपूर्वी भेट घेऊन मराठीला प्राधान्य देण्याची मागणी केली. त्यावेळी विभागीय व्यवस्थापकांनी समितीला सकारात्मक प्रतिसाद दिला. समितीने दिलेल्या मुदतीत रेल्वे प्रशासनाने कार्यवाही न केल्याने समितीने विभागीय कार्यालय परिसरात आंदोलन छेडले. त्यालाही रेल्वे प्रशासनाने दाद न दिल्याने अखेर समितीने न्यायालयीन लढा लढण्याची तयारी सुरू केल्याचे समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनी सांगितले. त्यासाठी समितीने पश्चिम रेल्वेच्या अतिरिक्त विभागीय व्यवस्थापकांना नोटीस पाठवल्याचे त्यांनी सांगितले. त्यात महाराष्ट्रात इतर भाषांच्या दडपणामुळे मराठीचे खच्चीकरण केले जात आहे व मराठीचे अस्तित्व संपवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यामुळे महाराष्ट्रातच मराठीचे अस्तित्व टिकवून ठेवण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.