शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
2
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
3
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
4
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
5
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
6
'तुमच्या स्वार्थाचं गणित उघड झालं'; मुख्यमंत्री केलं नाही म्हणणाऱ्या अजित पवारांना आव्हाडांचे प्रत्युत्तर
7
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
8
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
9
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
10
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
11
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
12
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
13
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
14
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
15
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
16
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
17
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
18
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
19
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
20
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!

पाणीबिल थकवले : सरकारी कार्यालयांचा पाणीपुरवठा केला खंडित

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2019 3:16 AM

कल्याण-डोंबिवली महापालिकेने मालमत्ताकर व पाणीपट्टीवसुलीचे लक्ष्य गाठण्यासाठी मोहीम अधिक गतिमान केली आहे.

कल्याण - कल्याण-डोंबिवली महापालिकेने मालमत्ताकर व पाणीपट्टीवसुलीचे लक्ष्य गाठण्यासाठी मोहीम अधिक गतिमान केली आहे. पाणीपुरवठा विभागाने पाणीबिल थकवल्याप्रकरणी कल्याण तहसील, पंचायत समिती, टेलिफोन एक्स्चेंज कार्यालय व पोलीस वसाहतीचा पाणीपुरवठा खंडित केला आहे.कल्याणमधील पोलीस वसाहतीने एक कोटी १९ लाख रुपयांचे पाणीबिल थकवल्याने केडीएमसीने आठ पाणीजोडण्या तोडल्या आहेत. तहसील कार्यालयाने एक लाख ३१ हजार रुपये, तर कल्याण पंचायत समितीने सहा लाख ७६ हजार रुपये पाण्याचे बिल थकवले आहे. या दोन्ही कार्यालयांचा पाणीपुरवठा खंडित करण्यात आला आहे. याशिवाय, टेलिफोन एक्स्चेंज कार्यालयाने एक लाख ६० हजार रुपयांचे पाणीबिल थकवले आहे. महापालिकेने या कार्यालयातील सात पाणीजोडण्या तोडल्या आहेत.पाणीपुरवठा ही अत्यावश्यक बाब आहे. महापालिका त्याच्या देखभाल-दुरुस्तीवर कोट्यवधींचा खर्च करते. पाणीपुरवठा वेळेवर न केल्यास ग्राहक महापालिकेविरोधात मोर्चे काढून आंदोलने करतात. मात्र, पाणीबिलाची थकबाकी भरण्यासाठी नोटीस पाठवल्यास त्यास प्रतिसाद दिला जात नाही. महापालिकेने यंदा पाणीबिलाच्या वसुलीसाठी ६० कोटी रुपयांचे लक्ष्य ठेवले आहे. त्यापैकी ५५ कोटींची वसुली झाली आहे. ३१ मार्चपर्यंत पाच कोटींची वसुली करण्यासाठी महापालिकेने थकबाकीदारांचा पाणीपुरवठा खंडित करण्यास सुरुवात केली आहे.मालमत्ताकराच्या वसुलीचे ३५० कोटी रुपयांचे लक्ष्य महापालिकेस गाठावयाचे आहे. त्याकरिता, महापालिकेने थकबाकी न भरणाऱ्या मालमत्ताधारकांच्या मालमत्ता लिलावात काढण्यास सुरुवात केली आहे. ६३ मालमत्तांचा २२ आणि २९ मार्चला लिलाव केला जाणार आहे.बिल्डरांनी थकवला करमोकळ्या जागेवरील कराच्या थकबाकीची रक्कम बिल्डर महापालिकेत भरत नाहीत. नोटीस बजावूनही त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे.ज्या मालमत्ताधारकांनी अथवा बिल्डरने बांधकाम परवानगी घेतली आहे, ज्याचे बांधकाम सुरू आहे, मात्र मोकळ्या जागेचा कर भरलेला नाही, अशांची बांधकाम परवानगी थकबाकी भरेपर्यंत स्थगित करावी, असे आदेश आयुक्त गोविंद बोडके यांनी दिले आहेत.ज्या मालमत्ताधारकांनी महापालिकेकडून बांधकाम परवानगी घेतली आहे, तसेच बांधकाम सुरू केलेले नाही, मात्र त्यांच्याकडून मालमत्ताकराचे येणे आहे, अशा मालमत्ताधारकांच्या जमिनी महापालिका लिलावाद्वारे घेणार आहे. त्यांच्या सातबारावर मालमत्ताकराच्या थकबाकीची नोंद करण्याचे आदेश कल्याण तहसीलदारांना आयुक्त बोडके यांनी दिले आहेत. 

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका