शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
2
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
3
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
4
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
5
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
6
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
7
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
8
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
9
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
10
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
11
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
12
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
13
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
14
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
15
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
16
Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट?
17
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
18
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
19
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवली-बदलापूरमध्ये प्रदूषण वाढल्याने जलस्रोत होतात दूषित

By admin | Updated: November 15, 2016 04:37 IST

रासायनिक सांडपाणी सोडताना कारखानदार तसेच सांडपाणी प्रक्रिया केंद्रे निकषांची पूर्तता करत नाहीत. यासंदर्भात ‘वनशक्ती’ या पर्यावरण संस्थेची याचिका

मुरलीधर भवार / डोंबिवलीरासायनिक सांडपाणी सोडताना कारखानदार तसेच सांडपाणी प्रक्रिया केंद्रे निकषांची पूर्तता करत नाहीत. यासंदर्भात ‘वनशक्ती’ या पर्यावरण संस्थेची याचिका राष्ट्रीय हरित लवादाकडे न्यायप्रविष्ट आहे. जून २०१६ मध्ये प्रदूषणाची मात्रा कमी झाल्याचा दावा प्रदूषण नियंत्रण मंडळाने केला होता. मात्र, १५ दिवसांपूर्वी ‘वनशक्ती’ने डोंबिवली व बदलापूर येथील सांडपाणी प्रक्रिया केंद्रातील पाण्याचे नमुने घेतले असता त्यात प्रदूषणाची मात्रा वाढल्याचे आढळले. कारखानदार व सांडपाणी प्रक्रिया केंद्रे धूळफेक करणारी माहिती देत आहेत. त्याकडे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्ष आहे, असा आरोप करत ‘वनशक्ती’ने ही माहिती लवादाच्या निदर्शनास आणून दिली आहे. रासायनिक सांडपाण्यावर योग्य प्रक्रिया न करता प्रदूषित पाणी थेट कल्याण खाडी, उल्हास आणि वालधुनी नदीत सोडले जात आहे. त्यामुळे पाण्याचे स्रोत प्रदूषित होत आहेत. हे प्रदूषण रोखण्याच्या मागणीसाठी ‘वनशक्ती’ने नोव्हेंबर २०१३ मध्ये याचिका दाखल केली. ‘वनशक्ती’ने सांडपाण्याचे नमुने गोळा केले. त्यात प्रदूषण होत आहे, अशी बाब त्यांनी याचिकेद्वारे लवादाकडे मांडली. ती सध्या न्यायप्रविष्ट आहे. लवादाने वारंवार महाराष्ट्र आणि केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळांविरोधात कारवाईचे आदेश दिले आहेत. तसेच सोयीसुविधा न पुरवणाऱ्या एमआयडीसीसही वारंवार विचारणा केली आहे. प्रदूषण दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे, असा मुद्दा वारंवार प्रदूषण नियंत्रण मंडळ व एमआयडीसीने लवादासमोर मांडला आहे. तसेच प्रदूषणासंदर्भात प्रतिज्ञापत्रही लवादाकडे सादर केले आहे. लवादाने कालबद्ध कृती आराखडा सादर करण्याचे आदेश एमआयडीसी व प्रदूषण नियंत्रण मंडळास दिले आहे. लवादाने सांडपाणी प्रक्रिया केंद्र डोंबिवली, अंबरनाथ, औद्योगिक विकास महामंडळ, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर महापालिका, अंबरनाथ व बदलापूर पालिका यांना एकत्रित असा १०० कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता. त्याविरोधात कारखानदारांनी उच्च न्यायालयात दाद मागितली. मात्र, न्यायालयाने त्या आदेशाला स्थगिती दिली आहे. काही महापालिकांनी दंड भरण्याची तयारी दर्शवली आहे. दंडाच्या रकमेतून उल्हास नदी, कल्याण खाडी व वालधुनी नदीत होणारे प्रदूषण दूर करण्याचा कार्यक्रम हाती घ्यावा, असे सूचित केले होते. लवादाने केंद्र व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळासह सगळ्यांना धारेवर धरल्यावर मंडळाने अंबरनाथ व डोंबिवलीतील एकूण १४४ रासायनिक कारखाने बंद केले. ही नोटीस २ जुलैपासून लागू आहे. त्यावरील स्थगिती लवादाने अद्याप उठवलेली नाही. डोंबिवली फेज टू मधील सांडपाणी प्रक्रिया केंद्र बंद आहे. तर, अंबरनाथमधील सांडपाणी प्रक्रिया केंद्र तीन महिन्यांसाठी २५ टक्के चालवण्यास मुभा दिली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर जून २०१६ मध्ये डोंबिवली फेज एकमधील सांडपाणी प्रक्रिया केंद्रातून प्रक्रिया करण्यात येणाऱ्या पाण्याची प्रदूषणाची मात्रा आटोक्यात आल्याचा दावा प्रदूषण नियंत्रण मंडळाने केला होता. तसेच डोंबिवली फेज दोनमधील सांडपाण्यातील प्रदूषणाची मात्रा कमी झालेली नाही.