शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

पाणीकपात वाढणार

By admin | Updated: February 24, 2016 03:09 IST

उल्हास नदीपात्रात पाणी सोडणाऱ्या बारवी आणि आंध्र धरणातील पाण्याची पातळी घसरून ती अवघे शंभर दिवस पुरेल इतकीच उरल्याने एमआयडीसीच्या पाणी उचलण्यावर मर्यादा आल्या आहेत.

- मुरलीधर भवार,  कल्याणउल्हास नदीपात्रात पाणी सोडणाऱ्या बारवी आणि आंध्र धरणातील पाण्याची पातळी घसरून ती अवघे शंभर दिवस पुरेल इतकीच उरल्याने एमआयडीसीच्या पाणी उचलण्यावर मर्यादा आल्या आहेत. परिणामी, सध्या लागू असलेली ४० टक्के पाणीकपात आणखी २५ टक्क्यांनी वाढवून ६५ टक्के करण्याचे तोंडी आदेश लघू पाटबंधारे विभागाने दिले आहेत. तसे झाल्यास याच पाण्यावर सर्वस्वी अवलंबून असलेल्या उल्हासनगर, मीरा-भाईंदरसारख्या महापालिका, २७ गावांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण होण्याची चिन्हे आहेत. सध्याप्रमाणे दोन दिवस पाणी बंद आणि उरलेल्या दिवसांत रोज निम्मी पाणीकपात किंवा एक दिवासआड पाणी आणि उरलेले दिवस कमी दाबाने पुरवठा अशी पाणीबाणी निर्माण झाली आहे. सध्याच्या ४० टक्के पाणी कपातीमुळे एमआयडीसी त्यांच्या पाणीग्राहकांना- त्या त्या पालिका किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांना दोन दिवस पाणी पुरवत नाही. नंतरही एक दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. परिणामी घरगुती ग्राहक त्रासलेले असतानाच उद्योगही अडचणीत आले आहेत. उल्हासनगर महापालिका पूर्णपणे एमआयडीसीच्या पाणी पुरवठ्यावर अवलंबून आहे. त्यांची स्वतंत्र पाणीपुरवठा योजनाच नाही. त्याचबरोबर कल्याण-डोंबिवली महापालिकेतील २७ गावांनाही एमआयडीसीकडून पाणीपुरवठा होतो. त्यांना ३० दशलक्ष लिटर पाणी दररोज पुरविले जाते. सध्याच्या ४० टक्के पाणी कपातीमुळेच या भागात परिस्थिती बिकट झाली आहे. एमआयडीसीच्या पाण्यावर मीरा-भाईंदर महापालिकेसह दिवा, मुंब्रा, कळवा या परिसरातील ग्राहक अवलंबून आहेत. सध्याची ही पाणीकपात ६५ टक्क्यांवर गेली, तर परिस्थिती आणखी बिकट होईल. ४० टक्के कपातीमुळे एमआयडीसीकडून आठवड्यातून केवळ साडेचार दिवस पाणीपुरवठा होतो. हॉटेलांना फटका, कामगारांवर उपासमारीची वेळएमआयडीसीचा 80%पाणीपुरवठा घरगुती आहे आणि उरलेला औद्योगिक म्हणजेच उद्योग, कारखान्यांना होतो. 3500कारखान्यांत ही 65%पाणीकपात लागू झाली, तर निम्मा आठवडा कारखाने बंद टेवण्याची वेळ येणार आहे. टँकरने पुरेसे पाणी मिळाले नाही, तर हॉटेलही बंद ठेवावी लागतील. त्याचा सर्वच व्यवसायांवर विपरित परिणाम होईल. उत्पादन घटेल. या कारखान्यांत साधारण लाखांवर कामगार काम करता. त्यांना टंचाईच्या काळात अकारण सुट्टी मिळेल आणि तेवढा पगार कमी झाल्याने त्यांच्या, कुटुंबीयांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. उपासमारीची वेळ येऊ शकते. दोन-तीन दिवसांत अंमलबजावणी?लघू पाटबंधारे खात्याने एमआयडीसीला वाढीव पाणी कपातीचे सध्या दिलेले आदेश तोंडी असल्याने लेखी आदेशाशिवाय ही २५ टक्के वाढीव पाणीकपात लागू करणार नाही; तिची अंमलबजावणी सुरु करणार नाही, असा पावित्रा एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी घेतला आहे. पण त्यामुले फार फरक पडणार नाही. २५ टक्के जादा पाणीकपातीची अंमलबजावणी तूर्त केवळ एक-दोन दिवस पुढे जाऊ शकते. लघू पाटबंधारे खात्याने या काळात लेखी स्वरुपात एमआयडीसीला आदेश दिले, तर वाढीव २५ टक्के कपात येत्या आठवड्यातच लागू होण्याची चिन्हे आहेत.