शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात शहरभर उभारणार कचऱ्याचे छोटे-मोठे प्रकल्प

By admin | Updated: January 7, 2016 00:47 IST

ठाणे महापालिकेला अद्याप ६५० मेट्रीक टन कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी हक्काचे डम्पिंग ग्राउंड न मिळाल्याने आता विकेंद्रीकरण करून कचऱ्याची

ठाणे : ठाणे महापालिकेला अद्याप ६५० मेट्रीक टन कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी हक्काचे डम्पिंग ग्राउंड न मिळाल्याने आता विकेंद्रीकरण करून कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार, त्यात्या प्रभाग समितीमध्येच कचऱ्याचे विविध स्वरूपाचे २ ते ५ टनांपर्यंतचे प्रकल्प उभारून त्यापासून बायोगॅस, कम्पोस्टिंग आणि गांडुळ खत प्रकल्पाचे प्लांट उभारले जाणार आहेत. यामध्ये पहिल्या टप्प्यात १०० टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जाणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. ठाणे महापालिकेला अद्यापही डायघर येथील डम्पिंग ग्राउंड ताब्यात घेता आलेले नाही. दोन वेळेला या ठिकाणी कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचे प्रकल्प हाती घेतले होते. परंतु, स्थानिकांचा होत असलेला विरोध पाहता हे दोन्ही प्रकल्प रखडले. त्यानंतर, तळोजा येथील सामायिक भरावभूमीत ठाणे महापालिका सहभागी झाली होती. परंतु, दराच्या मुद्यावरून एकमत न झाल्याने पालिकेचा हा प्रयोगही फसला.दरम्यान, पालिकेने गेल्या काही महिन्यांपासून सोसायटीधारकांकडून ओला आणि सुका कचरा वेगळा करून गोळा करीत आहे. त्यानुसार, या मोहिमेत आतापर्यंत १२५ च्या आसपास सोसायट्या सहभागी झाल्या असून त्यातून १०० टन कचरा गोळा होत आहे. या कचऱ्याची त्या प्रभागात विल्हेवाट लावण्यासाठी विकेंद्रीकरण करून प्रकल्प उभारण्याचे निश्चित केले आहे. त्यानुसार, २ ते ५ टनांचे हे प्लांट उभारले जाणार आहेत.