शहरं
Join us  
Trending Stories
1
'प्रोजेक्ट फ्रीडम' बंद, होर्मुझमधील जहाजांना यापुढे सुरक्षा देणार नाही; ट्रम्प यांची मोठी घोषणा
2
आसाम, बंगालमधील विजयानंतर भाजपा ‘या’ राज्यात ऑपरेशन लोटसच्या तयारीत? बड्या नेत्याने दिले संकेत
3
Multibagger Stock : १ लाखाचे बनले ३ कोटी रुपये; या शेअरनं दिला ३१०००% पेक्षा अधिक रिटर्न, एकेकाळी ₹१० पेक्षा कमी होती किंमत
4
पंजाबमध्ये हायअलर्ट! जालंधरनंतर अमृतसरमध्येही स्फोट; लष्करी तळ आणि BSF मुख्यालयाजवळ खळबळ
5
ममता बॅनर्जी राजीनामा देणार नाहीत, निवडणूक आयोगाने नोटिफिकेशन जारी केले; भाजप सत्ता कशी स्थापन करणार?
6
ममतांचा किल्ला कसा भेदला? काय होता विजयाचा फॉर्म्युला? भाजपचे चाणक्य अमित शाह यांच्या प्लॅनची ‘इनसाइड स्टोरी’
7
पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! भाजपने मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्...
8
तामिळनाडूत विजय होणार मुख्यमंत्री; काँग्रेसची पाठिंबा देण्याची तयारी, पण त्याबदल्यात काय हवं?
9
पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या ७ भारतीय खलाशांची केली मदत
10
राजीनामा देण्यास ममतांचा नकार, निवडणूक निकाल जनतेचा कौल नसून कटकारस्थान
11
आजचे राशीभविष्य ६ मे २०२६: आर्थिक गुंतवणुकीसाठी अनुकूल दिवस, धनलाभ होण्याची शक्यता
12
सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
13
निश्चय केलेल्या 'विजय'चा विजय! प्रस्थापित गडांना खिंडार पाडणारा 'थलपती'चा झंझावात
14
लैंगिक गुन्ह्यांतील आरोपींना पॅरोल नाकारणारा नवा कायदा येणार; मुख्यमंत्र्यांचे विधि व न्याय विभागाला निर्देश
15
आता सिलिंग जमिनींसाठी १० वर्षांनंतर मोठा दिलासा; जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकार; मोठ्या प्रकरणांना हवी राज्याची मंजुरी
16
नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव
17
हे भोंदू बुवा आणि बाबा इतके का आणि कसे बोकाळले?
18
मंत्रालयात कामाच्या धकाधकीत सुरांचा जल्लोष; मधुर गाण्यांनी टळटळीत दुपार झाली संस्मरणीय
19
दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव
20
भोंदूबाबा अशोक खरातला ५ दिवसांची पोलिस कोठडी; शिर्डी जमीन गैरव्यवहार : राहाता न्यायालयाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

ठामपाचे कर्मचारी सानुग्रहच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: October 24, 2015 23:29 IST

मुंबई, उल्हासनगर, मीरा-भार्इंदर आदी महापालिकांमध्ये भरगच्च असे सानुग्रह अनुदान मंजूर झाले असताना अद्यापपर्यंत ठाणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना किती सानुग्रह अनुदान मिळणार

ठाणे : मुंबई, उल्हासनगर, मीरा-भार्इंदर आदी महापालिकांमध्ये भरगच्च असे सानुग्रह अनुदान मंजूर झाले असताना अद्यापपर्यंत ठाणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना किती सानुग्रह अनुदान मिळणार अथवा मिळणार नाही, याबाबत कर्मचाऱ्यांमध्ये अनेक संभ्रम निर्माण झाले आहेत. त्यामुळे आता सानुग्रह अनुदानासाठी त्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसण्याचा निर्णय घेतला आहे.मुंबई महापालिकेनंतर ठाणे महापालिकेचा क्रमांक लागतो. मुंबई महापालिकेने कर्मचाऱ्यांना १३ हजार ५०० रुपयांचे सानुग्रह अनुदान मंजूर केले आहे. तर, मीरा-भार्इंदर महापालिकेने १४ हजार आणि आर्थिक डबघाईत असलेल्या उल्हासनगर महापालिकेने तर १४ हजार ५०० रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याचे निश्चित केले आहे. असे असतानाही ठाणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या सानुग्रह अनुदानाबाबत अद्यापही राजकीय नेते, युनियन आणि पालिका आयुक्तांची बैठक झालेली नाही. पालिकेची आर्थिक परिस्थिती ही पूर्वीपेक्षा अधिक सुस्थितीत आली असतानाही याबाबत प्रशासनाने कोणतेही ठोस पाऊल न उचलल्याने कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, म्युनिसिपल लेबर युनियनने पालिकेतील सर्व कामगार, कर्मचारी, अधिकारी एकत्रित वेतनावरील, ठोक पगारावरील कर्मचारी यांच्यासह, जिद्द शाळा, बालवाड्यांमधील कर्मचारी, शिक्षण विभाग, मलनि:सारण विभाग, व इतर विभागांतील काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांनाही २० हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान मिळावे, अशी मागणी केली आहे. निर्णय लवकरच होणारयेत्या सोमवारी युनियनने कर्मचाऱ्यांची बैठक सायंकाळी ५.३० च्या सुमारास आयोजित केली आहे. त्यानंतर, पुढील धोरण निश्चित केले जाणार आहे. यासंदर्भात महापौर संजय मोरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत लवकरच निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगितले.