Video : झाडाला धडकल्याने २५ टन धाग्याची वाहतूक करणाऱ्या कंटेनरला अपघात
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2022 18:19 IST2022-06-13T18:18:45+5:302022-06-13T18:19:36+5:30
Accident : घोडबंदर रोडवर तासभर वाहतूक कोंडी: सुदैवाने जिवित हानी टळली

Video : झाडाला धडकल्याने २५ टन धाग्याची वाहतूक करणाऱ्या कंटेनरला अपघात
ठाणे: भरधाव वेगाने २५ टन पॉलिस्टर धागा घेऊन दमणवरून घोडबंदर रोडमार्गे न्हावाशेवाकडे निघालेल्या कंटेनरची कापुरबावडी येथील रस्त्यालगत असलेल्या झाडाला धडक दिल्याची घटना सोमवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातामुळे हे झाड रस्त्याजवळील महावितरणच्या विद्युत खांबावर आणि कंटेनरवर कोसळले. या घटनेमुळे या मार्गावर तब्बल तासभर वाहतूक कोंडी झाली होती.
कापूरबावडी येथे कंटेनरने झाडाला धडक दिल्याने ते झाड पडले. या घटनेने वाहतूक कोंडी झाल्याची माहिती मिळताच घटनास्थळी कापूरबावडी वाहतूक पोलीस, वृक्षप्राधिकरण विभागाचे कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन विभाग, महावितरण विभागासह अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेतली. तब्बल एक तासांच्या प्रयत्नांनतर आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि अग्निशमन दलाच्या पथकांनी कंटेनर आणि वीज वितरणच्या खांबावर पडलेले झाड कापून ते बाजूला केले. त्यानंतर या मार्गावरील वाहतूक हळूहळू सुरळीत झाली. या घटनेत सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही. मे. एसजेए लॉजिसल इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचा हा कंटेनर घेऊन शिवकुमार यादव हा चालक २५-टन पॉलिस्टर टेक्सचराइज्ड धागा दमणवरून न्हावाशेवा येथे निघाला होता. त्याचवेळी हा अपघात घडल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ठाणे: भरधाव वेगाने २५ टन पॉलिस्टर धागा घेऊन दमणवरून घोडबंदर रोडमार्गे न्हावाशेवाकडे निघालेल्या कंटेनरची कापुरबावडी येथील रस्त्यालगत असलेल्या झाडाला धडक दिल्याची घटना सोमवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास घडली. pic.twitter.com/s2B4lDOCmk
— Lokmat (@lokmat) June 13, 2022