ठाण्यात गृहसंकुलांत लसीकरण होणार सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:42 AM2021-05-08T04:42:44+5:302021-05-08T04:42:44+5:30

ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रात मुंबईच्या धर्तीवर खासगी हॉस्पिटलच्या माध्यमातून गृहसंकुलातील लसीकरण सुरू करण्याचा त्याचबरोबर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी ...

Vaccination will start in Thane | ठाण्यात गृहसंकुलांत लसीकरण होणार सुरू

ठाण्यात गृहसंकुलांत लसीकरण होणार सुरू

Next

ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रात मुंबईच्या धर्तीवर खासगी हॉस्पिटलच्या माध्यमातून गृहसंकुलातील लसीकरण सुरू करण्याचा त्याचबरोबर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी ६० वर्षांवरील नागरिकांकरिता ड्राईव्ह इन लसीकरण सुरू करण्याचा निर्णय महापौर नरेश म्हस्के व महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत शुक्रवारी घेण्यात आला.

लसीकरण मोहीम प्रभावी व जलदगतीने व्हावी, यासाठी गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये लसीकरण करण्याबाबत धोरण निश्च‍ित करण्यात येणार आहे. ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांकरिता ड्राईव्ह इन लसीकरण मोहीम राबवण्याबाबत मार्गदर्शक तत्त्वे निश्चित केली जाणार आहेत. १८ ते ४४ या वयोगटातील नागरिकांना ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी सकाळी ९ व संध्याकाळी ५ अशा दोन सत्रांत स्लॉट उपलब्ध करुन देण्याबाबतचा निर्णयही घेतला आहे. लसीकरणाचा आढावा घेण्यासाठी कै. नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे बैठक आयोजित केली होती. या बैठकीस उपमहापौर पल्लवी कदम, सभागृह नेते अशोक वैती, स्थायी समिती सभापती संजय भोईर, शिवसेना गटनेते दिलीप बारटक्के, राष्ट्रवादीचे गटनेते नजीब मुल्ला, काँग्रेस पक्षाचे गटनेते दीपाली भगत, भाजपचे गटनेते मनोहर डुंबरे, नगरसेवक विक्रांत चव्हाण, अतिरिक्त आयुक्त गणेश देशमुख, संजय हेरवाडे, उपायुक्त संदीप माळवी, अशोक बुरपल्ले, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. चारुदत्त शिंदे, वैद्यकीय अधिकारी डॉ. वैजयंती देवगीकर, डॉ. खुशबू टावरी, डॉ. अदिती पवार आदी उपस्थित होते.

सद्यस्थ‍ितीत ठाणे शहरात ज्या प्रमाणात लसी उपलब्ध होत आहेत, त्या प्रमाणात सर्व लसीकरण केंद्रांवर लसीकरण सुरू आहे. तसेच १८ ते ४४ या वयोगटातील नागरिकांना ऑनलाईन नोंदणी सक्तीची असून या नागरिकांना स्लॉट उपलब्ध व्हावा यासाठी सकाळी ९ वा. व सायंकाळी ५ वा स्लॉट उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामुळे जास्तीत जास्त ठाणेकर नागरिकांना नोंदणी करणे शक्य होईल. ४५ व त्यापुढील नागरिकांना पहिल्या व दुसऱ्या डोससाठी नोंदणी करणे बंधनकारक आहे. परंतु, झोपडपट्टी विभागातील नागरिकांसाठी काही केंद्रावर ऑफलाईन लसीकरण सुविधा उपलब्ध करून देण्याबाबतही निर्णय घेण्यात आला आहे.

कोविड- १९ चा प्रादुर्भाव लक्षात घेता कमीत कमी कालावधीमध्ये सर्व नागरिकांना लसीकरण करणे आवश्यक असल्याने आगामी काळात लसींच्या उपलब्धतेनुसार वाढीव केंद्राबाबतही नियोजन करण्याबाबत प्रशासनाने कार्यवाही करावी, असेही या बैठकीत ठरविण्यात आले.

..........

वाचली

Web Title: Vaccination will start in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.