शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

जांभूळगाव शेल्टरमधील भिक्षुकांचे लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:45 IST

ठाणे : जिल्ह्यात कोरोना लसीकरण मोहीम वेगाने सुरु असतानाच जिल्हा प्रशासनाने बेघर व भटक्या नागरिकांचे लसीकरण करण्याची मोहीम ...

ठाणे : जिल्ह्यात कोरोना लसीकरण मोहीम वेगाने सुरु असतानाच जिल्हा प्रशासनाने बेघर व भटक्या नागरिकांचे लसीकरण करण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार जांभूळगाव येथील शेल्टरमध्ये वास्तव्यास असलेल्या ४५ भिक्षुकांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे. त्यांना दोनही डोस देण्यात आले आहेत.

जानेवारी महिन्यापासून जिल्ह्यातील फ्रंटलाईन वर्कर, आरोग्य विभागातील डॉक्टर्स आणि कर्मचारी, पोलीस विभागातील कर्मचारी आदींचे टप्प्याटप्प्याने लसीकरण सुरु झाले. लसीकरण करताना आधारकार्ड आणि पॅनकार्ड आवश्यक पुरावा म्हणून मागितला जात आहे. परंतु ठाण्यासह जिल्ह्याच्या विविध भागात आजही सिग्नलवर, फुटपाथवर, रस्त्याच्या कडेला, मंदिराबाहेर शेकडो भिकारी भीक मागताना दिसत आहेत. पोटाची खळगी भरण्यासाठी गजरे विकणे, फुगे विकणे, वाहने साफ करणे आदी व्यवसाय ही मंडळी करतात. या मुलांचा दररोज शेकडो लोकांशी संपर्क येतो. त्यामुळे या मुलांच्या माध्यमातून कोरोना संसर्ग पसरण्याचा धोका अधिक आहे. त्यात या भिकाऱ्यांकडे कोणत्याही प्रकारचे पुरावे नसल्याने त्यांचे लसीकरण कसे होणार, असा प्रश्न उपस्थित झाला होता.

दरम्यान, जिल्हा महिला व बालविकास विभागाच्या वतीने भिकाऱ्यांसाठी जांभूळगाव येथे शेल्टर होम आहे. या शेल्टर होममध्ये असलेल्या भिक्षुकांचे लसीकरण करण्यासाठीचे नियोजन आखण्यात आले आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून या शेल्टर मधील ४५ भिक्षेकरुंचे लसीकरण करण्यात आले असल्याची माहिती ठाणे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी महेंद्र गायकवाड यांनी दिली.