राज्य शासनाने प्रवासात फिजिकल डिस्टंसिंगसाठी शाळांच्या बसचा वापर करावा - डॉ. विनय सहस्त्रबुद्धे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2020 11:55 AM2020-09-17T11:55:02+5:302020-09-17T11:55:21+5:30

संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान त्यांनी राज्यसभेत कोरोना कसा रोखता येईल यासंदर्भात विचार मांडले. त्यावेळी त्यानी ठाणे जिल्हा त्यातही कल्याण डोंबिवली हॉटस्पॉट असल्याची चिंता व्यक्त केली.

Use school bus for physical distance travel by state government - Dr. Vinay Sahasrabuddhe | राज्य शासनाने प्रवासात फिजिकल डिस्टंसिंगसाठी शाळांच्या बसचा वापर करावा - डॉ. विनय सहस्त्रबुद्धे

राज्य शासनाने प्रवासात फिजिकल डिस्टंसिंगसाठी शाळांच्या बसचा वापर करावा - डॉ. विनय सहस्त्रबुद्धे

googlenewsNext

डोंबिवली  - राज्यात कोरोना रुग्ण झपाट्याने वाढत आहेत, राज्य शासनाने त्याची गंभीर दखल घ्यायला हवी, पण तसे होताना दिसत नाही ही खंत आहे. कम्युनिटी स्प्रेड वाढू नये यासाठी ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे. परंतु त्या बदल्यात राज्य शासनाने रस्ते वाहतूक अधिकाधिक सक्षम करावी, डोंबिवली ते मुंबई प्रवासात 7 तास लागत असल्याने नोकरदारांचे हाल होत आहेत. बसमध्ये फिजिकल डिस्टन्स पाळले जात नाही, हे योग्य नसून बस प्रवासात गर्दी वाढू नये यासाठी अधिक वाहने विशिष्ट वेळाने सोडण्यात यावी, त्यासाठी गरज पडल्यास शाळांच्या बस बंद आहेत त्या रस्त्यावर आणावे असे आवाहन राज्यसभेचे खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांनी केले.

संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान त्यांनी राज्यसभेत कोरोना कसा रोखता येईल यासंदर्भात विचार मांडले. त्यावेळी त्यानी ठाणे जिल्हा त्यातही कल्याण डोंबिवली हॉटस्पॉट असल्याची चिंता व्यक्त केली. ते म्हणाले की, केंद्र सरकार अतिशय गंभीर असून अद्याप लोकल सेवा त्यासाठीच सुरू केलेली नाही. पण रस्ते वाहतुकीला प्राधान्य दिले आहे, असे असतानाही ठाणे जिल्ह्यात मात्र डोंबिवली ते मुंबई प्रवासाला 7 तास लागत आहेत ही गंभीर बाब असल्याचे म्हटले. रस्त्यांची दुर्दशा झाली असून राज्य शासनाने त्याची दखल घ्यायला हवी आणि रस्ते वाहतूक सक्षम करण्याच्या दृष्टीने पावले उचलायला हवीत. कोरोना रोखण्यासाठी कडक नियमांची अंमलबजावणी करायला हवी, पण तसे होत नसल्याने त्याचा त्रास सामान्य नागरिकांना होत असल्याने चिंता व्यक्त केली.

बुधवारी झालेल्या सर्वपक्षीय कोरोना परिषदेत देखील प्रवासात कल्याण डोंबिवलीकरांचे जे हाल होत असल्याबद्दल आमदार रवींद्र चव्हाण, आमदार राजू पाटील, राजेश कदम, इरफान शेख, बाबा रामटेके आदींनी जाहीर नाराजी व्यक्त केली. डोंबिवलीत इंदिरा गांधी चौकात सकाळी बस पकडण्यासाठी नोकरदारांचे 3 किमी रांगा लागत आहेत हे वास्तव मनपा, सत्ताधारी का लपवत आहेत. सातत्याने त्या गर्दीबद्दल आवाज उठवला जात आहे, ती गर्दी विभागण्यासाठी पूर्वेला बस उभे करण्यासाठी 6 स्पॉट असावेत, ते कुठले असावेत याची माहिती आयुक्तांना, पालकममंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत दिल्याचे चव्हाण म्हणाले. पश्चिमेला देखील बस सोडाव्यात असेही सांगितले होते, परंतु त्याचे पालन केले गेले नाही ही वस्तुस्थिती असल्याची नाराजी त्यांनी व्यक्त केली.

कल्याण शीळ रस्त्याचे काम लॉकडाऊनच्या काळात झपाट्याने व्हायला हवे होते, पण तसे झाले नाही. जागोजागी खड्डे आहेत, पत्रिपुलावरील खड्डे कसे भरले जात होते त्याचा व्हिडिओ व्हायरल करावा लागला तेव्हा कुठं राज्य शासन जाग झालं आणि 24 तासाच्या आत डांबरीकरण करून खड्डे बुजवले गेल्याची माहिती आमदार राजू पाटील यांनी दिली. म्हणजेच मागे लागलं की बदल होणार असतील तर त्या दृष्टीने या पुढे काम हाती घ्यावी लागतील असा टोला यांनी लगावला.

महत्त्वाच्या बातम्या

Video - "या' गर्दीत कोरोना होत नाही असा सरकारचा समज आहे का?', मनसे नेत्याचा सवाल

CoronaVirus News : गेल्या 24 तासांत देशात तब्बल 97,894 नवे रुग्ण, रुग्णसंख्येने ओलांडला 51 लाखांचा टप्पा 

Narendra Modi Birthday : पंतप्रधान नरेंद्र मोदींना राहुल गांधी, कंगना राणौतने दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

भाजपा मंत्र्यांनी सरकारी गाडीवर लावला उलटा 'तिरंगा' अन्...

"केंद्र सरकार वादे आणि दावे करतंय पण कोरोना पुढे, देश मागे हेच 'वास्तव'; जनतेला सोसावे लागताहेत चटके"

Web Title: Use school bus for physical distance travel by state government - Dr. Vinay Sahasrabuddhe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.