ऐलो अलर्टनुसार जिल्ह्याला अवकाळी पाऊस; ठाण्यात ३.२९ मिमी पाऊस
By सुरेश लोखंडे | Updated: November 26, 2023 20:11 IST2023-11-26T20:11:20+5:302023-11-26T20:11:42+5:30
संध्याकाळी अचानक ढगांच्या गडगडाटासह विजेच्या कडकडाट या पावसाचे आगमन झाले. अर्ध्यातासात ३.२९ मिमी पाऊस ठाणे शहर परिसरात पडला.

ऐलो अलर्टनुसार जिल्ह्याला अवकाळी पाऊस; ठाण्यात ३.२९ मिमी पाऊस
ठाणे : जिल्ह्याला हवामान खात्याने अवकाळी पावसाचा आजपर्यंत दोन दिवस ऐलो अलर्ट देण्यात आला असता त्यानुसार सकाळी ६ वा व संध्याकाळी ६.३० कमी अधिक प्रमाणात जिल्ह्यात ठिकठिकाणी अवकाळी पाऊस पडला. संध्याकाळी अचानक ढगांच्या गडगडाटासह विजेच्या कडकडाट या पावसाचे आगमन झाले. अर्ध्यातासात ३.२९ मिमी पाऊसठाणे शहर परिसरात पडला.
अचानक पडलेल्या या पावसामुळे ठाणेकरांची चांगलीच धावपळ झाली. रस्त्यांवर काही ठिकाणी पाणी साचले. तर काही ठिकाणी वाहतूक कोंडीला तोंड द्यावे लागेल. यासह जिल्ह्यातील ठिकाणी पावसाने हजेरी लावली. ऐन रविवारी सुटीच्या दिवस असल्याने संध्याकाळी बाहेर पडलेल्यांना पाधसाने घर गाठायला भाग पाडले. हवेचा जोर आणि हवेतील वाढता गारवा लक्षात घेऊन नागरिक,ग्रामस्थांनी घर गाठणे पसंत केले.
या पावसादरम्यान भिवंडी महानगरपालिका हद्दीबाहेर आज दिनांक आज ६:५० वा. काल्हेर काशिनाथ पार्क बिल्डिंगवर वीज पडून आग लागली होती. या घटनेमध्ये कोणीही जखमी वा मृत नाही, असे भिवंडी महानगरपालिका मुख्य आपत्कालीन कक्षाने सांगितले