Ulhasnagar: मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या रिक्षावाल्याला गुंगीचा पेढा देऊन लुटले

By सदानंद नाईक | Published: March 18, 2023 05:25 PM2023-03-18T17:25:32+5:302023-03-18T17:26:07+5:30

Ulhasnagar News: उल्हासनगर शहरातील प्रसिद्ध बिर्ला विठ्ठल मंदिराच्या दर्शनासाठी आलेल्या अज्ञात दोघांनी रिक्षाचालक संजय रसाळ यांना गुंगीचा पेढा देऊन १ लाखाचे दागिने लंपास केले.

Ulhasnagar: A rickshaw puller who went for darshan in a temple was robbed with a gungi straw | Ulhasnagar: मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या रिक्षावाल्याला गुंगीचा पेढा देऊन लुटले

Ulhasnagar: मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या रिक्षावाल्याला गुंगीचा पेढा देऊन लुटले

googlenewsNext

- सदानंद नाईक 
उल्हासनगर : शहरातील प्रसिद्ध बिर्ला विठ्ठल मंदिराच्या दर्शनासाठी आलेल्या अज्ञात दोघांनी रिक्षाचालक संजय रसाळ यांना गुंगीचा पेढा देऊन १ लाखाचे दागिने लंपास केले. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस दोघांचा शोध घेत आहेत.

उल्हासनगर शहाड रेल्वे स्टेशन परिसरात रिक्षा चालविणारे संजय गजानन रसाळ यांच्याकडे १२ मार्च रोजी सायंकाळी साडे चार वाजता दोन अज्ञात इसम येऊन त्यांनी बिर्ला विठ्ठल मंदिरात देवदर्शन जाण्या बाबत विचारले. संजयने त्यांना रिक्षात बसून मंदिरा जवळ दर्शनासाठीबिर्ला विठ्ठल मंदिरात आणून मंदिर बाहेर त्यांची वाट पाहत उभे राहिले. देवदर्शन आटोपून मंदिर बाहेर आलेल्या दोघांनी देवाचा प्रसाद म्हणून गुंगीचा पेढा संजय यांना खाण्यास दिला. त्यानंतर शहाड फाटक येथे रिक्षाने पोहोचल्यावर लघुशंकाच्या बहाण्याने रिक्षाच्या बाहेर उतरले. तोपर्यंत संजय यांना गुंगी आली होती. गुंगीत असलेल्या संजय यांच्या अंगावरील सोन्याची चेन, दोन अंगट्या व एक मोबाईल असा एकून १ लाखाचा ऐवज लंपास केला. गुंगीतून बाहेर आलेल्या संजय यांना आपल्याला लुबाडल्याचे लक्षात आले. त्यांनी उल्हासनगर पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केल्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलीस अधिक तपास करीत आहे.

Web Title: Ulhasnagar: A rickshaw puller who went for darshan in a temple was robbed with a gungi straw

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.