अटक करण्याची धमकी देत मागितली खंडणी: उल्हासनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निलंबित

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2025 19:11 IST2025-05-15T19:10:17+5:302025-05-15T19:11:58+5:30

Extortion by police news: उल्हासनगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले जाधव व चव्हाण नावाच्या दोन पोलिसांनी एका प्रकरणात एका नागरिकाला ताब्यात घेऊन अटक करण्याची धमकी दिली होती.

Two policemen of Ulhasnagar police station suspended for demanding ransom by threatening to arrest | अटक करण्याची धमकी देत मागितली खंडणी: उल्हासनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निलंबित

अटक करण्याची धमकी देत मागितली खंडणी: उल्हासनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निलंबित

- सदानंद नाईक, उल्हासनगर
एका नागरिकाला अटक करण्याची धमकी देत २० हजाराची खंडणी मागणाऱ्या उल्हासनगर पोलीस ठाण्याच्या दोन पोलिसावर निलंबणाची कारवाई करण्यात आली. खंडणी मागण्याचा प्रकार २३ व २४ एप्रिल रोजी घडला असून याप्रकाराने पोलिसाच्या कारभारावर टीका होत आहे.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

उल्हासनगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले जाधव व चव्हाण नावाच्या दोन पोलिसांनी एप्रिल महिन्याच्या २३ तारखेला आणि २४ एप्रिल रोजी एका प्रकरणात एका नागरिकाला ताब्यात घेऊन अटक करण्याची धमकी दिली. अटक न करण्याच्या बदल्यात त्याच्याकडे २० हजार रुपयाची खंडणी मागितली होती. 

खंडणी मागितल्याचे पोलिसांना दिले पुरावे

दरम्यान सदर इसमाने याबाबत तक्रार केल्यावर, पोलिसांचा हा प्रताप उघड झाला. याबाबत इसमाने पोलिसांना पुरावेही दिले. झालेल्या याप्रकाराबाबत चौकशी सुरु असल्याची माहिती पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी दिली. 

वाचा >>व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस

न्यायालयात सबंधित पोलिसांनी सदर इसम उपस्थित नसल्याचे खोटे सांगितले. या कारणावरून दोन पोलिसांवर निलंबणाची कारवाई केल्याचे गोरे म्हणाले. 

पोलिसांच्या चौकशी दोन्ही पोलीस आढळले दोषी

ठाणे पोलीस आयुक्त यांच्या आदेशानुसार व सह पोलिस आयुक्त ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी प्राथमिक चौकशी केली. चौकशीत दोन पोलीस कर्तव्य करताना दोषी आढल्याने, त्यांचे बुधवारी निलंबित केले. 

याप्रकाराने पोलिसातील भयंकर चेहरा यनिमित्ताने उघड झाला. तसेच दोन्ही पोलिसांवर चौकशी अंती गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार असल्याचे विश्वासनीय पोलीस सूत्रांकडून समजते. अधिक तपास पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली होत असून उल्हासनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हणे यांनी पोलीस आयुक्त यांच्याकडे मिटींग मध्ये असल्याचे सांगून, याबाबत बोलणे टाळले आहे.

Web Title: Two policemen of Ulhasnagar police station suspended for demanding ransom by threatening to arrest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.