शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
3
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
4
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
5
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
6
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
7
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
8
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
9
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
10
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
11
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
12
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
13
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
14
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
15
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
17
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
18
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
19
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
20
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण-डोंबिवलीमध्ये आजपासून कायापालट मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2020 00:19 IST

आयुक्त होणार सहभागी; खडकपाडा सर्कल येथे प्रारंभ

कल्याण : कल्याण-डोंबिवलीत कायापालट मोहीम राबविली जाणार असून, त्याचा शुभारंभ गुरुवारी खडकपाडा सर्कल व बिर्ला कॉलेज परिसरात केला जाणार आहे. या मोहिमेत आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी सहभागी होणार आहेत. स्वच्छ व सुंदर कल्याण-डोंबिवली, यावर या मोहिमेचा अधिक भर राहणार आहे.खडकपाडा सर्कल ते संदीप हॉटेलदरम्यान रस्त्याची स्वच्छता करणे, दुभाजकाची रंगरंगोटी करणे, पदपथ रंगविणे ही कामे गुरुवारी केली जाणार आहेत. घनकचरा व्यवस्थापन विभागाने, यासाठी खास तयारी केली असून, नवीन झाडे मागवली आहेत, अशी माहिती सहायक आयुक्त गणेश बोराडे यांनी दिली.स्वच्छ, सुंदर कल्याण-डोंबिवली या उपक्रमाचा शुभारंभ २०१२ मध्ये तत्कालीन महापौर राजेंद्र देवळेकर असताना शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले होते. त्यावेळी ठाकुर्लीनजीक कल्याण-डोंबिवली समांतर रस्ता, गणेश मंदिरानजीक सेल्फी पाइंट विकसित करण्यात आला होता. तसेच प्रत्येक प्रभागात स्वच्छ सुंदर कल्याण-डोंबिवली हे अभियान राबविले जाईल, असे सांगण्यात आले होते. मोठ्या जोशात सुरू झालेली मोहीम सुरुवातीला काही प्रभागांत राबविली गेली. मात्र, त्यानंतर उत्साह ओसरला.दरम्यान, मुख्यमंत्री झाल्यानंतर ठाकरे यांनी अलीकडेच केडीएमसीत घेतलेल्या बैठकीत या मोहिमेचा पुनरुच्चार केला. तसेच त्यांच्या या मोहिमेचे पुढे काय झाले, याबाबत विचारणा केली. मोहीम थंडावली असेल तर, ती पुन्हा सुरू करून शहर स्वच्छ व सुंदर करण्यावर भर द्या, याकडे लक्ष वेधले. त्यानुसार प्रत्येक प्रभागात कायापालट मोहीम हाती घेण्यात आली आहे.रस्त्यांसाठी प्रस्ताव तयारमुख्यमंत्र्यांनी रस्ते, स्वच्छता आणि शहर सुशोभीकरणासाठी १०० कोटींचा निधी देण्याचे मान्य केले होते. त्याचा प्रस्ताव तयार करून महापालिकेने तो राज्य सरकारला पाठवावा, असेही सूचित केले होते. तो प्रस्ताव शहर अभियंत्यांनी तयार केला आहे. त्यामुळे कल्याण व डोंबिवलीतील प्रत्येकी ५० कोटींचे रस्ते तयार करण्याचे प्रस्ताव तयार केले आहेत. मात्र, स्वच्छता व सुशोभीकरणासाठी काय सुचविले आहे, हे प्रस्तावात स्पष्ट झालेले नाही.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका