टोईंग कर्मचाऱ्यांची भिवंडीत दादागिरी

By Admin | Updated: October 12, 2016 04:24 IST2016-10-12T04:24:05+5:302016-10-12T04:24:05+5:30

रस्त्यात उभ्या केल्या जाणाऱ्या चारचाकी वाहनांवर वाहतूक पोलीस व टोईंग कर्मचारी कारवाई करत नाही. उलट रस्त्यात अडथळा न करणारे दुचाकी वाहने

Towing Employees False Dadaagiri | टोईंग कर्मचाऱ्यांची भिवंडीत दादागिरी

टोईंग कर्मचाऱ्यांची भिवंडीत दादागिरी

भिवंडी : रस्त्यात उभ्या केल्या जाणाऱ्या चारचाकी वाहनांवर वाहतूक पोलीस व टोईंग कर्मचारी कारवाई करत नाही. उलट रस्त्यात अडथळा न करणारे दुचाकी वाहने जबरदस्तीने टोईंग वाहनात टाकून त्यांच्याकडून जबरदस्तीने दंड वसूल करतात अशा तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. वाहतूक पोलीस नेमलेल्या जागेवर बऱ्याचवेळा हजर नसतात. राजीव गांधी चौक येथे वाहतूक शाखेच्या कार्यालयासमोरील चौकात कधीही पोलीस वाहतूक नियंत्रण करीत नसल्याने नेहमी येथे कोंडी होते. अंजुरफाटा ते नदीनाका व राजीव गांधी चौक ते साईबाबा बायपास या मार्गावरील दुचाकी व चारचाकी गाड्या तसेच ट्रान्सपोर्ट आणि खासगी ट्रॅव्हल्सच्या गाड्या उभ्या असतात. या वाहनांवर कारवाई होत नाही.

Web Title: Towing Employees False Dadaagiri