शहरं
Join us  
Trending Stories
1
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
2
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
3
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
4
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
5
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
6
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
7
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
8
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
9
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
10
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
11
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
12
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
13
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
14
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
15
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
16
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
17
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
18
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
19
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  

टोरंट पॉवरच्या कर्मचाऱ्याचा जमावाच्या मारहाणीत मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2021 14:38 IST

घरत कंपाऊंड येथे वीजचोरी तसेच थकीत वीजबिल मीटरसंदर्भात कारवाई करण्यासाठी टोरंट पॉवरचे कर्मचारी गेले असता, स्थानिक नागरिकांनी त्यांना विरोध केला.

भिवंडी  : थकीत वीजबिल, तसेच अवैध वीज कनेक्शनविरोधात कारवाई करण्यासाठी गेलेले टोरंट पॉवरचे सुरक्षारक्षक तुकाराम पवार (वय ५५) यांचा जमावाने केलेल्या बेदम मारहाणीत मृत्यू होण्याची घटना शनिवारी काटई खाडीपार येथे घडली. (Torrent Power employee beaten to death by mob) घरत कंपाऊंड येथे वीजचोरी तसेच थकीत वीजबिल मीटरसंदर्भात कारवाई करण्यासाठी टोरंट पॉवरचे कर्मचारी गेले असता, स्थानिक नागरिकांनी त्यांना विरोध केला. पवार यांनी जमावाला रोखण्याचा प्रयत्न केला असता, जमावाने त्यांना शिवीगाळ करत धक्काबुक्की आणि मारहाण केली. त्यात पवार गंभीररीत्या जखमी झाल्याने त्यांना इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.टोरंट पॉवर प्रत्येक कारवाईदरम्यान पोलीस फाटा घेऊन जात असते. मात्र, आज पोलीस बंदोबस्त का घेतला नाही, असा सवाल करीत कंपनीही दोषी असल्याचा आरोप पवार कुटुंबीयांनी केला. याप्रकरणी टोरंटतर्फे निजामपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधितांवर पुढील कारवाई करण्यात येईल, अशी माहिती टोरंट पॉवरचे जनसंपर्क अधिकारी चेतन बदयानी यांनी दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसthaneठाणे