शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
2
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
3
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
4
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
5
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
6
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
7
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
8
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
9
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
10
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
11
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
12
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
13
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
14
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
15
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
16
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
17
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
18
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
19
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
20
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
Daily Top 2Weekly Top 5

कोविड लसीकरण केंद्रावर शुक्रवारी तोबा गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:42 IST

डोंबिवली : चार दिवसांनी प्राप्त झालेली कोविड लस घेण्यासाठी शुक्रवारी बहुतांश केंद्रांबाहेर नागरिकांची तोबा गर्दी झाल्याचे दृश्य शुक्रवारी ...

डोंबिवली : चार दिवसांनी प्राप्त झालेली कोविड लस घेण्यासाठी शुक्रवारी बहुतांश केंद्रांबाहेर नागरिकांची तोबा गर्दी झाल्याचे दृश्य शुक्रवारी दिसून आले. या प्रक्रियेत प्रचंड गोंधळ असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. पहाटेपासून केंद्राबाहेर नंबर लावले जात असून, भर उन्हात केवळ नाइलाज म्हणून नागरिकांना तासन्‌तास उभे राहावे लागत आहे.

ज्येष्ठ नागरिकांना बसण्याची तरी व्यवस्था करावी, जेणेकरून त्यांना उन्हाचा त्रास होणार नाही, तसेच पेंडॉल टाकल्यास अन्य नागरिकांना उभे राहता येईल, असे नागरिकांचे म्हणणे होते. लसीकरण करताना सोशल डिस्टन्सिंग राखणे गरजेचे असताना ठिकठिकाणी शाळेच्या बाहेर नागरिकांची गर्दी होती. त्यामुळे कोरोनावर नियंत्रण मिळवण्याच्या उद्देशालाच हरताळ फासला जात आहे. त्याचप्रमाणे योग्य ती माहिती मिळत नसल्याने नागरिकांना दूरपर्यंत जावे लागत असल्याचे दिसून आले.

माघारी जावे लागल्याने नाराजी

शहरातील जवळपास १२ केंद्रांवर लसीकरण सकाळी सुरू झाले; परंतु सगळ्या ठिकाणी सुमारे ३०० जणांचे लसीकरण झाल्यानंतरही नागरिक वेटिंगवर होते. कार्यकर्त्यांनी टोकन देऊन टाकल्याने आणि त्यानुसार वेळ दिल्याने नागरिक दुपारनंतर केंद्रावर आले. मात्र, तेथे आल्यावर त्यांना माघारी फिरावे लागल्याने अनेकांचा हिरमोड झाला.

.......

वाचली