शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाला जाणाऱ्या तिघा भावंडांवर काळाचा घाला, आईचा आधार हरपला, पर्हे गावी लग्नाघरी दु:खाचा डोंगर कोसळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2026 11:17 IST

Kalyan Accident: वडिलांच्या निधनानंतर आई अंजना यांनी घरकाम करून मुलांना मोठे केले. मुलांनीही कष्टाने शिक्षण घेतले. नोकरी करून आईला आधार देण्याचे स्वप्न ते पाहत होते. मात्र, नियतीच्या मनात काही वेगळेच होते.

- सचिन सागरे कल्याण  - वडिलांच्या निधनानंतर आई अंजना यांनी घरकाम करून मुलांना मोठे केले. मुलांनीही कष्टाने शिक्षण घेतले. नोकरी करून आईला आधार देण्याचे स्वप्न ते पाहत होते. मात्र, नियतीच्या मनात काही वेगळेच होते. कल्याण-मुरबाड रोडवर झालेल्या अपघातात मूळचे मुरबाड तालुक्यातील असलेले आणि रोजीरोटीसाठी दिवा येथे राहणाऱ्या मोहपे कुटुंबातील दोन बहिणी आणि भावाचा करुण अंत झाला. त्यांच्या आईला आता कोणाचाही आधार नाही. ज्यांना लहानाचे मोठे केले, तेच तिला सोडून गेले.दिवा येथील मोहपे कुटुंबातील नेहा (वय २२), मानसी (२०) आणि प्रथमेश (१७) ही तीन भावंडे गावाकडील सोमवारचा हळदी समारंभ आणि त्यानंतरच्या लग्नासाठी पर्हे (कांदली) येथे जात होते. प्रथमेशने नुकतीच दहावीची परीक्षा दिली होती. सुटीचा आनंद, गावाची ओढ त्याला लागली होती. तिघा भावंडांचा हा अखेरचा प्रवास ठरला. आपल्या लेकरांचा असा दुर्दैवी अंत झाल्याचे दु:ख त्यांच्या आईला पचविता येणार नाही. त्यामुळे त्यांना कळविले नसल्याची माहिती नातेवाइकांनी दुपारी दिली. त्यांचे नातेवाईक रुग्णालयात आले होते.

- प्रकाश जाधवमुरबाड : पर्हे गावी हळदी समारंभ आणि लग्नासाठी येणाऱ्या मोहपे कुटुंबातील तिघा भावंडांचे अपघातात निधन झाल्याने लग्नाघरी नातेवाइकांवर दु:खाचा डोंगर कोसळला. पर्हे गावावरही शोककळा पसरली. घरात असलेल्या शुभकार्यावर एक प्रकारे विघ्न आल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.  पर्हे गावात काकाच्या मुलाच्या लग्नासाठी आईने मुलांना पुढे पाठवले होते. तीनही भावंडे एकत्र बसून गप्पा मारत येत होती. काळाने घाला घातल्याने तिघांचा अपघाती मृत्यू झाला, असे त्यांचे नातेवाईक नितीन आणि विकास मोहपे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. टॅक्सीत ६ प्रवाशांची परवानगी असताना ११ प्रवासी कसे घेतले? आरटीओ काय करतात? अशा प्रश्नांची सरबत्ती त्यांनी केली. 

English
हिंदी सारांश
Web Title : Tragedy Strikes: Three Siblings Die En Route to Wedding in Parhe

Web Summary : Three siblings from Diva died in an accident on their way to a wedding in Parhe, Murbaad. The accident leaves their mother without support, casting a pall over the wedding celebrations and the village.
टॅग्स :kalyanकल्याणAccidentअपघात