Video : थरार! भरधाव एक्सप्रेस समोर तरूणाने मारली उडी, पोलिसाने जीव धोक्यात घालून वाचवला जीव
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2022 18:55 IST2022-03-23T18:47:58+5:302022-03-23T18:55:45+5:30
Young man jumps in front of running Express : विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकातील घटना सीसीटीव्हीत कैद

Video : थरार! भरधाव एक्सप्रेस समोर तरूणाने मारली उडी, पोलिसाने जीव धोक्यात घालून वाचवला जीव
बदलापूर : एका तरुणाने भरधाव एक्सप्रेस समोर उडी मारल्याची घटना आज दुपारी विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकात घडली. यावेळी तिथे उपस्थित रेल्वेपोलिसाने जीव धोक्यात घालून या तरुणाला रेल्वे रुळातून बाजूला केले. ही संपूर्ण थरारक घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. तरुणाला वाचवणारा पोलीस कर्मचारी हा बदलापूरचा रहिवासी आहे.
कुमार गुरुनाथ पुजारी असे रेल्वे रुळात उडी मारणाऱ्या १८ वर्षीय तरुणाचे नाव असून तो उल्हासनगरच्या प्रेमनगर टेकडी भागात राहणारा आहे. आज दुपारी 3.30 वाजताच्या सुमारास कुमार पुजारी हा विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर येऊन उभा राहिला. यावेळी कल्याणहून कर्जतच्या दिशेने जाणारी एक्सप्रेस भरधाव वेगात येताना पाहून कुमार याने अचानक रेल्वे रुळात उडी मारली आणि एक्सप्रेस समोर उभा राहिला.
VIDEO: एका तरुणानं भरधाव एक्सप्रेस समोर उडी मारल्याची घटना आज दुपारी विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकात घडली. यावेळी उपस्थित रेल्वे पोलिसानं जीव धोक्यात घालून या तरुणाला रेल्वे रुळातून बाजूला केले. ही संपूर्ण थरारक घटना सीसीटीव्हीत कैद pic.twitter.com/ywuQydTOyd
— Lokmat (@lokmat) March 23, 2022
ही बाब तिथल्या रेल्वे पोलिसांना दिसताच येताच रेल्वे पोलिसांनी तातडीने प्रसंगावधान दाखवत रेल्वे उडी घेतली आणि या तरुणाला रुळातून बाजूला केलं. ऋषिकेश चंद्रकांत माने असे या तरुणाला वाचवणाऱ्या रेल्वे पोलीस जवानाचे नाव असून त्याच्या धाडसाचे यानंतर कौतुक होत आहे. दरम्यान, कुमार पुजारी याने कौटुंबिक वादविवादातून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची प्राथमिक माहिती रेल्वे पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलीस पुढील तपास करतायत.