शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

कळव्यामध्ये तीन दिवसात तीन महिलांचे मोबाईल हिसकावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2021 6:19 PM

कळवा परिसरात तीन दिवसात तीन वेगवेगळया महिलांच्या हातातील मोबाईल जबरीने हिसकावून चोरटयांनी पलायन केल्याची घटना घडली.

ठळक मुद्दे परिसरात भीतीचे वातावरणकळवा पोलीस ठाण्यात तीन जबरी चोरीचे गुन्हे दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: कळवा परिसरात तीन दिवसात तीन वेगवेगळया महिलांच्या हातातील मोबाईल जबरीने हिसकावून चोरटयांनी पलायन केल्याची घटना घडली. याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात तीन जबरी चोरीचे गुन्हे दाखल केले आहेत.पहिल्या घटनेत पारसिकवाडी, इंदिरानगर येथे राहणारी १८ वर्षीय तरुणी २५ फेब्रुवारी २०२१ रोजी सायंकाळी ७ ते ७.२५ वाजण्याच्या सुमारास मफतलाल तलावाच्या समोरुन मोबाईलवर बोलत पायी जात होती. त्याचवेळी तिथे आलेल्या एका चोरटयाने तिच्या हातातील मोबाईल खेचून तिथून पलायन केले. दुसरी घटना कळवा इंदिरानगर भागात घडली. २६ फेब्रुवारी रोजी ३२ वर्षीय महिला रात्री ८.१५ वाजण्याच्या सुमारास इंदिरानगर येथून पायी जात असतांना तिच्या हातातील सात हजारांचा मोबाईल एका चोरटयाने जबरीने हिसकावून पलायन केले. तर तिसऱ्या घटनेत खारेगाव भागात राहणारी २५ वर्षीय महिला २७ फेब्रुवारी रोजी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास मफतलाल तलावाच्या समोरुन मोबाईलवर बोलत जात होती. त्याचवेळी एका अनोळखी चोरटयाने तिच्या हातातील १८ हजारांचा मोबाईल हिसकावून पलायन केले. या तिन्ही घटनेबाबत कळवा पोलीस ठाण्यात जबरी चोरीचे तीन गुन्हे दाखल झाल्याची माहिती मंगळवारी कळवा पोलिसांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीRobberyचोरी