शहरं
Join us  
Trending Stories
1
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
2
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
3
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
4
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
5
Top Marathi News Live: मराठी सक्तीची डेडलाईन एक वर्षाने पुढे ढकलली जावी- संजय निरुपम
6
Rahul Meena : "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन?
7
IPL 2026: 'ग्रीन कॉरिडॉर'मुळे लुंगी एन्गिडी ११ मिनिटांत पोहोचला रुग्णालयात; होतंय कौतुक
8
सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
9
Donald Trump: "मी बलात्कारी नाही...", गोळीबाराच्या घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प असं का म्हणाले?
10
Palmistry: तुमच्या मनगटावर किती रेषा आहेत? जाणून घ्या तुमच्या आरोग्याचं आणि श्रीमंतीचं गुपित!
11
US Israel Iran War : पाकिस्तान मध्यस्थीसाठी योग्य देश नाही; इराणच्या खासदाराचे खळबळजनक विधान
12
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
13
VIDEO: "मुलांना घेऊन जा..."; बाहेरून वह्या घेतल्या म्हणून मुख्याध्यापिका भडकल्या, गेट लॉस्ट म्हणत पालकांना धमकी
14
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
15
पंजाबचे माजी DIG हरचरण सिंग भुल्लर यांच्या ११ ठिकाणांवर ED चा छापा; घरात सापडलेले ७.३६ कोटी
16
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
17
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
18
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
19
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
20
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

कळव्यात अतिक्रमण हटविणाऱ्या वनकर्मचाऱ्यांवर दगडफेक: दोन वनपालांसह तिघे जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2020 00:03 IST

कळव्यातील वनजमिनींवर होणारे अतिक्रमण रोखणा-या दोन वनपालांसह तिघांवर अतिक्रमणधारकांनी दगडफेक केल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. या घटनेत तिघे वनकर्मचारी जखमी झाले असून तिघांविरुद्ध कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे कळवा पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखलगस्तीदरम्यान अतिक्रमणाचा प्रकार उघड

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: कळव्यातील पारसिकनगर, घोलाईनगर येथील वनजमिनीवरील अतिक्रमणाला विरोध करणाºया वनपाल समीर इनामदार आणि अर्जून निचित यांच्यासह तिघेजण दगडफेकीत जखमी झाल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभर संचारबंदी असल्यामुळे वनजमिनीवर कुठेही अतिक्रमण होऊ नये यासाठी ठाणेवनविभागाने प्रत्येक क्षेत्रात एकदिवसाआठ गस्तीचे नियोजन केले आहे. २८ मे रोजी दुपारी कळवा येथील वनपाल समीर इनामदार, महापेचे (नवी मुंबई) वनपाल अर्जून निचिते आणि वनमजूर सचिन म्हात्रे यांचे पथक दुपारी १ ते १.३० वाजण्याच्या सुमारास गस्त घालीत होते. त्यावेळी काही भटके रहिवाशी या भागात बांधकाम करीत असल्याची बाब या पथकाच्या निदर्शनास आली. त्यांनी या अतिक्रमणाला अटकाव करण्याचा प्रयत्न केला. तेंव्हा बारकू पवार या अतिक्रमण धारकासह तिघांनी निचिते यांच्यासह तिघांवरही दगडफेक करीत हल्ला केला. यात निचिते यांच्या डोक्याला तर इनामदार यांच्या हाताला जबर मार लागला. वनमजूर म्हात्रे हे देखिल या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याची घटना दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडली. या तिघांवरही कळव्यातील मनिषा नगर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. दरम्यान, याप्रकरणी कळवा रुग्णालयात बारकू पवार याच्यासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या हे अतिक्रमण थांबविण्यात आल्याची माहिती वनविभागाने दिली.

 

टॅग्स :thaneठाणेforest departmentवनविभागCrime Newsगुन्हेगारी