शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेनंतर कर्नाटकात ऑपरेशन नाथ, काँग्रेस सरकार कोसळणार? एकनाथ शिंदेंचा दावा, सिद्धरामय्यांची प्रतिक्रिया
2
काशी-वाराणसीतील मराठी समाज मोदींच्या पाठिशी; रोड शोमध्ये पंतप्रधानांचं मराठमोळं स्वागत
3
कोणताही मूर्ख माणूस असा उघडपणे बॅगा घेऊन पैसे वाटप करू शकतो का? राऊतांच्या दाव्यांवर शिंदे गटाचे प्रत्युत्तर
4
'कदम, दरेकर भाजपामध्ये गेल्यावर तोंडात दात नव्हते का?, सुषमा अंधारेंचा राज ठाकरेंवर पलटवार
5
बेपर्वाईचे १४ बळी,७८ जखमी; घाटकोपरला पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळले, अवकाळी पावसाचा तडाखा
6
आजचे राशीभविष्य १४ मे २०२४; सूर्य वृषभेत, दलाली, व्याज, कमिशनमधून मोठ्या धनलाभाची शक्यता
7
महामुंबईला अवकाळीचा तडाखा; मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबई, रायगड, पालघरला पावसाने झोडपले
8
राज्यभरातील होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करा: CM एकनाथ शिंदे, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
9
“मुझे बचाव, मैं शेड के नीचे फस गया हूँ”; होर्डिंगखाली दबलेल्या जखमीची सुटका
10
...तर पाकला हातात बांगड्या घालायला लावू! अणुशक्तीवरुन इंडिया आघाडीवर PM मोदींचा घणाघात
11
महाराष्ट्रात टक्का वाढेना; देशातील ९६ मतदारसंघात सरासरी ६६ टक्के मतदान
12
खिचडी सरकारकडून १२ लाख कोटींचा घोटाळा; अमित शाह यांचा महाआघाडीवर आरोप
13
प्रश्न: विवाह कधी करणार? राहुल गांधी म्हणाले, आता लवकरच करावा लागेल...
14
चुका नेहरूंच्या, मोदींना दोष कशासाठी? परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, काँग्रेसकडून जनतेची दिशाभूल
15
‘आधार’चा अभिमान; पण आयुष्य बनले ‘निराधार’!; देशात पहिले आधार कार्ड मिळालेल्या महिलेची कहाणी
16
सकाळी लोकलने, संध्याकाळी पावसाने मुंबईकरांना झोडपले; मध्य रेल्वेवर लोकल गोंधळामुळे तारांबळ
17
वादळी पावसाने मुंबईची अवस्था वाईट; हवामान खाते म्हणते, “आम्ही अलर्ट दिला होता”
18
जैन समाजाच्या समस्या सोडवण्यास नेहमीच तत्पर राहू; देवेंद्र फडणवीस, प्रमोद सावंत यांची हमी
19
“पीयूष गोयल मुंबईसह राज्याच्या विकासासाठी प्रयत्न करतील”; CM एकनाथ शिंदे यांना विश्वास
20
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 

मुख्यमंत्रीच अज्ञातस्थळी... सर्व मंत्री अन् खासदार एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील निवासस्थानी

By अजित मांडके | Published: March 29, 2024 9:22 PM

ठाण्यातील निवासस्थानी मंत्री खासदार तीन तास मुख्यमंत्र्यांच्या प्रतीक्षेत

ठाणे : रत्नागिरी -सिंधुदुर्ग आणि नाशिक लोकसभा जागेचा महायुतीतील तिढा अदयाप सुटलेला नाही. याबाबत चर्चा करण्यासाठी शुक्रवारी सायंकाळी उद्योगमंत्री उदय सामंत, त्यांचे बंधू किरण सामंत तसेच आमदार सुहास कांदे हे मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी आले होते. मात्र मुख्यमंत्री हे उपस्थितीत नसल्याने त्यांची कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्याशी चर्चा झाली. मात्र ही भेट राज्यातील शिवसेनेच्या सर्व उमेदवारांच्या प्रचाराच्या नियोजनाच्या संदर्भात होती. त्यावरच चर्चा झाली अशी माहिती शिवसेनेच्या वतीने देण्यात आली.

शुक्रवारी मंत्री दादा भुसे, मंत्री उदय सामंत, शंभूराज देसाई खासदार हेमंत गोडसे, आमदार सुहास कांदे,रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेसाठी इच्छुक किरण सामंत यांनी मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील निवासस्थानी हजेरी लावली. मुख्यमंत्री अज्ञात स्थळी असल्याने तब्बल तीन तास सर्वच मंत्री आमदार खासदारांना मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील निवासस्थानी तात्काळत बसावं लागलं. मात्र उद्योगमंत्री उदय सामंत, त्यांचे बंधू किरण सामंत, नाशिक येथील नांदगावचे आमदार सुहास कांदे यांनी कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्याशी चर्चा केली. यावेळी शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के हे ही उपस्थित होते. दरम्यान या भेटीनंतर बोलतांना म्हस्के म्हणाले की राज्यात ज्या ज्या ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार आहेत. तिथे प्रचाराचे नियोजन करण्यासाठी ही बैठक होती. त्यात प्रचार यंत्रणा कशी राबवायची  यासंदर्भात चर्चा करण्यात आली. तसेच ज्या जागा शिवसेनेच्या हक्काच्या आहेत. त्या मिळवण्यासाठी आमचा प्रयत्न असेल. त्यावर महायुतीतील वरिष्ठ नेते योग्य निर्णय घेतील असे त्यांनी सांगितले. तर नाशिक लोकसभेची  जागा पारंपरिक शिवसेनेची आहे. त्यामुळे ती आमच्याच वाट्याला येईल. आमचा आमच्या वरिष्ठ नेत्यांवर विश्वास आहे. अशी प्रतिक्रिया आमदार सुहास कांदे यांनी दिली. तसेच लोकशाहीत कोणालाही कोणत्याही जागेवर हक्क सांगण्याचा अधिकार आहे. त्याप्रमाणे छगन भुजबळ यांनी तसा दावा केला असेल. पण नियमाप्रमाणे ती जागा शिवसेनेच्या वाट्याला येईल. त्यानुसार तिथे कशी प्रचारयंत्रणा राबवायाची यांसंदर्भात आम्ही आज चर्चा केल्याचेही त्यांनी सांगितले. तर किरण सामंत यांनी मात्र कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया देणे यावेळी टाळले.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री आज दिवसभर ठाण्यात असूनही ठाण्यातील निवासस्थानी आलेल्या मंत्र्यांची भेट घेणं त्यांनी टाळलं नक्की ही भेट घेणं का टाळलं असावं हे जरी  गुलदस्तात असलं तरी सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या मनात नेमकं आहे काय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेChief Ministerमुख्यमंत्रीthaneठाणेlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४