शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
3
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
4
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
5
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
6
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
7
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
8
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
9
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
10
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
11
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
12
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
13
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
14
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
15
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
16
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
17
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
18
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
19
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
20
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्याचा दुचाकी चोरटा जेरबंद

By admin | Updated: December 14, 2014 23:47 IST

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई : दुचाकी विक्रीसाठी आला होता साताऱ्यात

सातारा : ठाणे येथील वर्तकनगर येथून चोरी झालेली दुचाकी शनिवारी रात्री स्थानिक गुन्हे शाखेने सातारा येथे हस्तगत केली. दुचाकी चोरटा आदित्य हणमंत सावंत यासही अटक केली असून, दुचाकी आणि त्याला वर्तकनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.याबाबतची स्थानिक गुन्हे शाखेतून मिळालेली अधिक माहिती अशी की, आदित्य हणमंत सावंत हा गोलमारुती मंदिरानजीक असणाऱ्या सागर जाधव यांच्या मोटार गॅरेजमध्ये चोरीची बजाज प्लसर मोटारसायकल विक्री करण्यासाठी घेऊन येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांना मिळाली. यानंतर त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत सापळा रचला. थोड्याच वेळात सागर जाधव यांच्या गॅरेजजवळ एक युवक नंबर प्लेट नसलेल्या निळ्या रंगाची दुचाकीवर बसलेला दिसला. त्याचे वर्तन संशयास्पद वाटल्यामुळे त्याला नाव, गाव आणि वाहन चालविण्याचा परवाना याची माहिती विचारली. त्यांनी आपले नव आदित्य हणमंत सावंत (वय १९, व्यवसाय - नोकरी, रा. लक्ष्मी चिरागनगर, जे. के. ग्राम केमिकलच्या मागे, पोखरड रोड नंबर १, ठाणे) असे सांगितले. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक अनंत चिंचकर, शामराव मदने, पृथ्वीराज घोरपडे, आवारे, संजय पवार, विजय कांबळे, शरद बेबले, मुबीन मुलाणी, नितीन शेळके, प्रवीण शिंदे, कांतिलाल नवघणे, नितीन भोसले, महेश शिंदे यांनी सहभाग घेतला. (प्रतिनिधी)दोन महिन्यांपूर्वी केली होती चोरीगाडीची कागदपत्रे कुठे आहेत, अशी विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली आणि दुचाकी वर्तकनगर, ठाणे येथून आणली असल्याचे सांगितले. दरम्यान, पोलिसांनी वर्तकनगर पोलीस ठाण्यातून अधिक माहिती घेतली असता ही मोटारसायकल ७0 हजार रुपये किमतीची असून, तिचा क्रमांक एमएच 0४ जीके २६४१ असा आहे. ती दोन महिन्यांपूर्वी चोरीला गेली असल्याचा गुन्हा नोंद झाला असल्याचे स्पष्ट झाले. यानंतर आदित्य सावंत आणि दुचाकी वर्तकनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली.