शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्याच्या अक्षया अय्यरने पटकाविले कांस्यपदक

By admin | Updated: January 5, 2016 01:24 IST

७६ व्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ अ‍ॅथलेटिक चॅम्पियनशिप स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणाऱ्या श्रद्धा घुलेपाठोपाठ ठाण्याच्या अक्षया अय्यर हिनेदेखील

ठाणे : ७६ व्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ अ‍ॅथलेटिक चॅम्पियनशिप स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणाऱ्या श्रद्धा घुलेपाठोपाठ ठाण्याच्या अक्षया अय्यर हिनेदेखील चमकदार कामगिरी करीत कांस्यपदकावर आपले नाव कोरले. या स्पर्धेत श्रद्धाची सर्वोत्कृष्ट अ‍ॅथलेट म्हणून निवड करण्यात आली. रविवारी या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला. २९ डिसेंबरपासून पटियाला येथे सुरू झालेल्या अ‍ॅथलेटिक चॅम्पियनशिप स्पर्धेचा रविवारी समारोप झाला. या वेळी झालेल्या २०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत अक्षया प्रथमच वरिष्ठ गटातून खेळली. मुंबई विद्यापीठाचे तिने प्रतिनिधित्व केले. २५.२७ सेकंदांत तिने २०० मीटरचे अंतर गाठले. या प्रकारात १३० मुली सहभागी झाल्या होत्या. यापैकी आठ मुलींची अंतिम सामन्यासाठी निवड झाली होती. याच स्पर्धेत चार दिवसांपूर्वी झालेल्या १०० मीटर प्रकारात अक्षया सहाव्या स्थानावर होती. १२.३९ सेकंदांत तिने हे अंतर गाठले. यापूर्वी राज्यस्तरीय स्पर्धेत अनेक सुवर्णपदके तिने पटकाविली आहेत. निलेश पाटकर यांच्या मार्गदर्शनाखाली ती सराव करीत असून पुढच्या वर्षी ती वरिष्ठ गटातून खेळणार आहे. त्यादृष्टीने तिची तयारी सुरू असल्याचे पाटकर यांनी सांगितले. लांब उडीमध्ये सुवर्णपदक पटकावणाऱ्या श्रद्धाची सर्वोत्कृष्ट अ‍ॅथलेट म्हणून निवड झाल्याचे रविवारी जाहीर करण्यात आले. (प्रतिनिधी)