ठाणेकर चमकले : डॉ. बेडेकरांनी ३ तास २८ मिनिटांमध्ये पूर्ण केली पॅरिस मॅरेथॉन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2026 23:13 IST2026-04-12T23:13:25+5:302026-04-12T23:13:51+5:30

ठाणे : ठाण्यातील आंतरराष्ट्रीय पातळीवरील धावपटू डॉ. महेश बेडेकर यांनी जगातील सात मॅरेथॉन पूर्ण केल्यानंतर त्यांनी पॅरिस येथील 42.2 ...

Thanekar shines: Dr. Bedekar completes Paris Marathon in 3 hours 28 minutes | ठाणेकर चमकले : डॉ. बेडेकरांनी ३ तास २८ मिनिटांमध्ये पूर्ण केली पॅरिस मॅरेथॉन

ठाणेकर चमकले : डॉ. बेडेकरांनी ३ तास २८ मिनिटांमध्ये पूर्ण केली पॅरिस मॅरेथॉन

ठाणे : ठाण्यातील आंतरराष्ट्रीय पातळीवरील धावपटू डॉ. महेश बेडेकर यांनी जगातील सात मॅरेथॉन पूर्ण केल्यानंतर त्यांनी पॅरिस येथील 42.2 किलोमीटरची मॅरेथॉन ३ तास 28 मिनिटांमध्ये पूर्ण केली. या मॅरेथॉन मध्ये 130 देशांमधील 600 धावपटू सहभागी झाले होते.

डॉ. बेडेकर हे हौशी धावपटू आहेत. त्यांनी पॅरिस मॅरेथॉनसाठी तीन महिने आधीच उपवन येथील परिसरात सराव सुरू केला होता. रविवारी त्यांनी ही मॅरेथॉन पूर्ण केली. सकाळी साडेआठ वाजता (पॅरिस येथील वेळेप्रमाणे) या मॅरेथॉनला सुरुवात केली. शॉन झेलिझे या रस्त्यावर ही मॅरेथॉन आयोजित केली होती. डॉ. बेडेकर म्हणाले की, वर्षातून एकदा तरी जागतिक मॅरेथॉन मध्ये सहभाग घेण्याचा मानस आहे. तसेच तेथील अनुभव सांगताना ते म्हणाले की, आपलं शहर स्वच्छ ठेवणं ही फक्त सरकारची नाही, तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे, हे मला या कार्यक्रमातून शिकायला मिळालं.

६०,००० धावपटू सहभागी असूनही जवळजवळ कुठलाही कचरा दिसला नाही. नागरिक स्वतः कागदी पिशव्या घेऊन शहर स्वच्छ ठेवण्यासाठी पुढाकार घेत होते. जगातील सर्वात सुंदर शहरांपैकी एका शहरात धावण्याचा अनुभव खरोखर आनंददायी होता. मार्गावर एक भव्य स्मारकही होते, ज्यामुळे धावण्याचा अनुभव अधिक खास झाला. हवामान उत्तम होते, संपूर्ण मार्ग चढ-उतारांचा (rolling route) होता, विशेषतः शेवटचे ५ किमी आव्हानात्मक होते, पण त्यातही काही उतारांनी धावण्याला वेग दिला.

प्रशिक्षणाचा हंगाम समाधानकारक झाला, मात्र स्पर्धेतील कामगिरी ही त्या एका दिवसावर अवलंबून असते. याआधी tyani सातवी मेजर मॅरेथॉन असलेली सिडनी मॅरेथॉन यशस्वीपणे पूर्ण केली. त्यांनी ३:३३:२३ तासांच्या आत ४२ किमी अंतर पार केले. विशेष म्हणजे, ही कामगिरी करणाऱ्या जगातील फक्त ४,००० धावपटूंमध्ये त्यांचा समावेश झाला.

Web Title : ठाणेकर चमके: डॉ. बेडेकर ने 3 घंटे 28 मिनट में पूरी की पेरिस मैराथन

Web Summary : ठाणे के डॉ. महेश बेडेकर ने 3 घंटे 28 मिनट में पेरिस मैराथन पूरी की। 130 देशों के 600 धावकों में वे शामिल थे। उन्होंने पेरिस से प्रेरित होकर स्वच्छता पर जोर दिया और पहले सिडनी मैराथन पूरी की।

Web Title : Thanekar Shines: Dr. Bedekar Completes Paris Marathon in 3:28 Hours

Web Summary : Dr. Mahesh Bedekar of Thane completed the Paris Marathon in 3 hours 28 minutes. He was among 600 runners from 130 countries. He emphasized cleanliness, inspired by Paris, and previously completed the Sydney Marathon.