ठाणे जिल्हा परिषदेला एसबीआय बॅंकेच्या सीएसआर फंडातून रूग्णवाहिकेचा लाभ

By सुरेश लोखंडे | Published: January 25, 2024 05:14 PM2024-01-25T17:14:00+5:302024-01-25T17:14:36+5:30

ठाणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागास भारतीय स्टेट (एसबीआय) बँकेतर्फे समारंभपूर्वक रुग्णवाहिका बुधवारी सुपूर्द करण्यात आली.

Thane zilla parishad benefited from ambulance from sbi bank csr fund | ठाणे जिल्हा परिषदेला एसबीआय बॅंकेच्या सीएसआर फंडातून रूग्णवाहिकेचा लाभ

ठाणे जिल्हा परिषदेला एसबीआय बॅंकेच्या सीएसआर फंडातून रूग्णवाहिकेचा लाभ

सुरेश लोखंडे,ठाणे : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागास भारतीय स्टेट (एसबीआय) बँकेतर्फे समारंभपूर्वक रुग्णवाहिका बुधवारी सुपूर्द करण्यात आली. या बँकेच्या व्यावसायिक सामाजिक दायित्व (सी.एस.आर.) अंतर्गत घेण्यात आलेल्या या रुग्णवाहिकेची चावी मुंबई मेट्रो सर्कल भारतीय स्टेट बँकेचे महाव्यवस्थापक जुही स्मिता सिन्हा यांच्या हस्ते ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल यांच्याकडे देण्यात आली.

याप्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) अविनाश फडतरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डाँ. गंगाधर परगे, भारतीय स्टेट बँक, ठाणे विभाग, मुंबई मेट्रो सर्कलचे उप महाव्यवस्थापक रामकुमार तिवारी, सहाय्यक महाव्यवस्थापक पंकजकुमार पाठक, ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील भारतीय स्टेट बँकेचे मुख्य प्रबंधक अवधुत तिरवडकर उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने सिन्हा यांनी सांगितले की, भारतीय स्टेट बँक ही अग्रगण्य शासकीय बँक असून या बँकेतर्फे नागरिकांना विविध प्रकारच्या सुविधा उपलब्ध करुन देण्यात येतात. यापुढेही या सेवा अधिक उत्तमरित्या देण्यासाठी ही बँक कटीबध्द असून व्यावसायिक सामाजिक दायित्व (सी.एस.आर.) अंतर्गत देखील आपली सामाजिक जबाबदारी अधिक सक्षमतेने पार पाडण्यात येईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.

Web Title: Thane zilla parishad benefited from ambulance from sbi bank csr fund

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.