शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024: कोलकाता हैदराबाद आज विजेतेपदासाठी आमनेसामने... कोण बनणार चॅम्पियन?
2
प.बंगालची आघाडी कायम; सर्वाधिक ७९.३५% मतदान; सहाव्या टप्प्यात एकूण ६१.०४ टक्के मतदान
3
भाव वधारताच वाढली सोने तस्करी! गतवर्षी पकडले ५०० किलो सोने, काही कारखाने उद्ध्वस्त
4
१० जूनला मान्सून मुंबईत पोहोचणार? शहरात शनिवारी संपूर्ण दिवसभर होतं ढगाळ वातावरण
5
आशिष शेलारांचे ‘कहीं पे निगाहें कहीं पे निशाणा’? मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीनंतरही नालेसफाईची पाहणी
6
दिवाळीत नव्या घरात जाणार रणबीर-आलिया? बांधकामाची सुरू असलेल्या घराची पाहणी
7
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
8
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
9
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
10
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
11
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
12
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
13
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
14
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
15
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
16
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
17
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
18
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
19
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
20
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका

 ठाणे पोलिसांनी हस्तगत केले चोरी आणि गहाळ झालेले १०० मोबाईल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2022 12:46 AM

गेल्या काही दिवसांमध्ये ठाणे शहर परिसरातून चोरीस गेलेले तसेच गहाळ झालेल्या तब्बल शंभर मोबाईल फोनचा शोध घेण्यात ठाणे पोलिसांच्या मालमत्ता गुन्हे शोध पथकाला यश आल्याची माहिती गुन्हे अन्वेषण विभागाचे सहायक पोलीस आयुक्त दिनकर मोहिते यांनी बुधवारी दिली.

ठळक मुद्देगुन्हे अन्वेषण विभागाच्या मालमत्ता शोध पथकाची कामगिरीदोघांना अटक

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: गेल्या काही दिवसांमध्ये ठाणे शहर परिसरातून चोरीस गेलेले तसेच गहाळ झालेल्या तब्बल शंभर मोबाईल फोनचा शोध घेण्यात ठाणे पोलिसांच्या मालमत्ता गुन्हे शोध पथकाला यश आल्याची माहिती गुन्हे अन्वेषण विभागाचे सहायक पोलीस आयुक्त दिनकर मोहिते यांनी बुधवारी दिली. यामध्ये दोन चोरीचे तसेच दोन सोनसाखळी चोरीचेही गुन्हे उघड झाले असून याप्रकरणी अरुण कांबळे ( वय २६, रा. कल्याण) याच्यासह दोघांना अटक केल्याचेही त्यांनी सांगितले.ठाणे शहर परिसरातील वाढत्या मोबाईल चोरी तसेच जबरी चोरीच्या घटनांवर आळा बसण्यासाठी तसेच ते उघडकीस आणण्याचे आदेश पोलीस आयुक्त जयजीत सिंग यांनी दिले होते. त्याच पार्श्वभूमीवर गुन्हे अन्वेषण विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांच्या मार्गदर्शनाखाली एका मोबाईल जबरी चोरी विरोधी पथकाची निर्मिती करण्यात आली. या पथकातीलपोलीस उपनिरीक्षक महेश जाधव तसेच पोलीस अंमलदार राजेंद्र काठोळे, अनिल पाटील, शशिकांत भदाणे, नामदेव मुंडे, रोशन जाधव, सागर सुरळकर आणि हुसेन तडवी यांनी तांत्रिक माहितीच्या आधारे मोठया कौशल्याने तपास करीत चोरीस गेलेल्या मोबाईल फोनचा शोध घेण्यास सुरु वात केली होती.याचदरम्यान २० डिसेंबर २०२१ रोजी आधी अरुण कांबळे याला दिवा येथून तर ठाणे रेल्वे स्थानक परिसरातून विशाल जाधव याला अटक केली. कांबळे याच्या चौकशीत रेल्वेतील एका मोबाईल चोरीचा शोध लागला. तर विशालकडून मोबाईल चोरीसह कोपरीतील दोन सोनसाखळी चोरीचे असे तीन गुन्हे उघड झाले आहेत. या पथकाने वेगवेगळया कंपनीचे १०० मोबाईल आणि चार गुन्हे उघडकीस आणले आहेत. दोघांनाही संबंधित पोलीस ठाण्यात वर्ग केले आहे. त्याचबरोबर आणखी काही मोबाईलचा अजूनही शोध घेतला जात आहे. यातील दहा मोबाईल हे चोरीतील तर ९० मोबाईल गहाळ झालेले मिळाल्याचे पोलिसांनी सांगितले.बहाणा करीत सामान्य नागरिकांना मोबाईलची विक्री-मोबाईलची चोरी केल्यानंतर आपली आई आजारी आहे. तसेच गावी जायचे आहे, त्यासाठी पैसे नसल्याचा बहाणा करीत चोरटयांनी सामान्य नागरिकांना हे मोबाईल विक्री केल्याचे समोर आले. त्यानंतर त्यांनी पलायन केले. अशा चोरटयांचाही शोध घेण्यात आहे.* मोबाईल घेताना अशी घ्या काळजी-मोबाईल चोरी झाला असल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यांशी संपर्क करावा. तसेच प्रवासात अथवा रस्त्याने मोबाईल चोरी जाणार नाही अथवा गहाळ होणार नाही याची काळजी घ्यावी. अल्प किंमतीमध्ये कोणी मोबाईलची विक्री करीत असल्यास खातरजमा करुनच ते खरेदी करावे, अन्यथा पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारी