शहरं
Join us  
Trending Stories
1
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
2
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
3
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
4
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
5
बाबा वेंगाची सोन्याबाबत मोठी भविष्यवाणी; पाहा आता दरांबाबत काय म्हटलंय? खरं झालं तर...
6
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले...
7
"तुमच्यापाशी दुसरा तुल्यबल विचारच नाही..."; कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या सूनेने संजय गायकवाडांना सुनावले
8
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
9
‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून वाद पेटला; आमदार-प्रकाशक संघर्षातून राज्यात नवे राजकीय वादळ
10
'भुजिया किंग' शिवरतन अग्रवाल यांचे निधन; शुन्यातून उभारले हजारो कोटींचे साम्राज्य...
11
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
12
Gondia Crime: 'तुला जिवे मारीन' म्हणत हात-पाय बांधून शाळेत डांबले; लग्नासाठी अल्पवयीन मुलीचे अपहरण
13
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
14
आता खासगी शाळांमध्येही फक्त NCERT पुस्तके, महागड्या पुस्तकावर बंदी; NHRC ने राज्यांना दिला ३० दिवसांचा वेळ
15
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
16
Trinamool Congress vs BJP: तृणमूल अन् भाजप यांच्यात थेट लढत; ‘तिसरी आघाडी’मुळे कोणाचा स्वप्नभंग
17
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
18
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
19
तामिळनाडूमध्ये ५.७३ कोटी मतदार ठरवणार ४,०२३ उमेदवारांचे भवितव्य, 'या' जागांवर सर्वांची नजर
20
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे मनपाच्या शाळा दुरुस्तीसाठी ३९ कोटी

By admin | Updated: September 11, 2015 23:23 IST

ठाणे महापालिका शिक्षण मंडळ शाळांच्या दुरवस्थेची लोकमतने सविस्तर वृत्तमालिकेद्वारे चिरफाड केल्यानंतर प्रशासनाने १३४ शाळांच्या ८५ इमारतींचे सर्वेक्षण पूर्ण केले होते.

ठाणे : ठाणे महापालिका शिक्षण मंडळ शाळांच्या दुरवस्थेची लोकमतने सविस्तर वृत्तमालिकेद्वारे चिरफाड केल्यानंतर प्रशासनाने १३४ शाळांच्या ८५ इमारतींचे सर्वेक्षण पूर्ण केले होते. त्यात ३१ शाळा या २५ ते ३० वर्षे जुन्या असल्याने त्यांच्या सर्वांगीण दुरुस्तीचा अहवाल सार्वजनिक बांधकाम विभागाने शिक्षण विभागाकडे दिला होता. मात्र, पालिकेची आर्थिक पत खालवल्याने यासाठी आवश्यक खर्च करणे पालिकेला शक्य नसल्याने दुरुस्तीचा हा प्रस्ताव दोन महिन्यांपासून प्रलंबित होता. परंतु, आता या शाळांची दुरुस्ती करण्याचे पालिकेने निश्चित केले असून येत्या तीन वर्षांत २७ शाळांची तीन टप्प्यांत दुरुस्ती केली जाणार आहे. यासाठी ३९ कोटींची तरतूद केली आहे. त्यामुळे या शाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या १२ हजार विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. ठाणे महापालिकेच्या १२७ शाळा या ८५ इमारतींमध्ये भरतात. शहरातील जुन्या आणि जीर्ण इमारतींसंदर्भात ती इमारत राहण्यासाठी सुरक्षित आहे की नाही, याचा अहवाल संबंधित अभियंत्यांकडून स्ट्रक्चरल आॅडिट करून सादर करण्याच्या सूचना पालिकेने दिल्या होत्या. पालिकेच्या मालकीच्या इमारतींसह या शाळा ज्या इमारतीमध्ये भरतात, त्यांचे स्ट्रक्चरल आॅडिट पालिका स्वत:च करणार होती. यापैकी अन्य इमारतींचे ते झाले नसले तरी पालिका शाळांचे पूर्ण झाले असून यामध्ये ३१ शाळांच्या इमारती दुरुस्तीयोग्य असल्याचे या अहवालामध्ये नमूद केले होते. यापैकी ४ इमारती अतिधोकादायक असल्याने त्या रिकाम्या केल्या आहेत. तर, काही तोडल्या आहेत. यामध्ये कौसा, उथळसर, टेंभीनाका, येऊर येथील शाळांच्या इमारतींचा समावेश आहे. त्यामुळे आता उरललेल्या २७ शाळांच्या इमारतींची दुरुस्ती तीन वर्षांमध्ये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.५.१० कोटी नव्या इमारतींसाठीपालिकेमार्फत प्रस्तावित केलेल्या ३९ कोटींमध्ये १.५ कोटी हे किरकोळ कामासाठी खर्च करण्यात येणार असून ५.१० कोटी हे नवीन शाळा बांधण्यासाठी खर्च केले जाणार आहेत. ३९ कोटींपैकी पहिल्या वर्षी १२ कोटी, दुसऱ्या वर्षी १२ आणि तिसऱ्या वर्षी १४ कोटी खर्च करणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. या २७ शाळांमध्ये माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीमधील सर्वाधिक ९ शाळांचा समावेश असून त्याखालोखाल कळवा-मुंब्य्रात ६, कोपरी २, उथळसर २, नौपाडा १, वर्तकनगर १, वागळे २ आदींचा यात समावेश आहे.या २७ शाळांमध्ये १० ते १२ हजार विद्यार्थी सद्य:स्थितीत शिक्षण घेत असून तेथे अनेक सुविधांची वानवा आहे. परंतु, आता लाद्यांपासून रंग, खिडक्या, शौचालये, भिंती, जिने आदींसह इतर सर्वच गोष्टींची दुरुस्ती केली जाणार आहे.माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीमधील ढोकाळी, वाघबीळ, मानपाडा, तरीचापाडा, मोघरपाडा, बाळकुम, आझादनगर, ओवळा, कासारवडवली. वागळे इस्ेटट- शांतीनगर, सावरकरनगर वर्तकनगर- शिवाईनगर, कोपरी- कोपरी गाव, पारशेवाडी, नौपाडा- दगडी शाळा कळवा-मुंब्रा - आतकोनेश्वरनगर, कळवा पोस्ट आॅफिस, आनंदनगर, दिवा, महात्मा फुलेनगर, मुंब्रा मार्केट, देवीचापाडा ४उथळसर- राबोडीच्या दोन शाळांचा समावेश आहे.शाळांची अवस्था अतिशय दयनीयलोकमतने काही महिन्यांपूर्वी सविस्तर वृत्तमालिकेद्वारे महापालिका शाळांच्या दुरवस्थेबाबत चिरफाड केली होती. त्यानंतर, ज्या शाळांची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे, परंतु त्या शाळा दुरुस्त होऊ शकतात, अशा शाळांच्या दुरुस्तीचा अहवाल तयार केला होता.परंतु, त्यासाठी जो आवश्यक निधी होता, तो मात्र केवळ पालिकेच्या तिजोरीत निधी नसल्याने हा प्रस्ताव रखडून होता. यासंदर्भातही लोकमतने वाचा फोडताच अखेर आता या शाळांच्या दुरुस्तीचा मार्ग मोकळा झाला आहे.