शहरं
Join us  
Trending Stories
1
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
3
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
4
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
5
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
6
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
7
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
8
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
9
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
10
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
11
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
12
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
13
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
14
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
15
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
16
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
17
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
18
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
19
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
20
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
Daily Top 2Weekly Top 5

आनंद आश्रमाचा साधा पत्रा तरी बदलला आहे का?; नरेश म्हस्केंचा राजन विचारेंना सवाल

By अजित मांडके | Updated: May 8, 2024 14:38 IST

शिंदे सेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांची प्रचार रॅली ठाण्याच्या विविध भागातून सुरु होती. यावेळी पत्रकारांशी बोलतांना त्यांनी हे वक्तव्य केले.

ठाणे :  राजन विचारे यांनी आतापर्यंत आनंद आश्रमातला एक पत्रा तरी बदलला आहे का ? त्यांच्याकडे टिका करण्यापलिकडे आता काही शिल्लक राहिलेले नाही. त्यांना टिका करुद्या आम्ही आमचे काम करत राहू असे मत शिंदे सेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांनी व्यक्त केले. आनंद आश्रमात दिघे यांचा आदर राखण्यासाठी आम्ही धडपड केली आहे. संस्कृती परंपरा टिकविण्याचे काम आम्ही केले असल्याचेही ते म्हणाले. ही प्रचाराची रॅली नसून ही विजयाची रॅली असल्याचे ते म्हणाले.

शिंदे सेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांची प्रचार रॅली ठाण्याच्या विविध भागातून सुरु होती. यावेळी पत्रकारांशी बोलतांना त्यांनी हे वक्तव्य केले. गद्दारी राजन विचारे यांनी बाळासाहेबांच्या विचारांची केली आहे. त्यांच्याकडे कार्यकर्ते नाहीत. एक महिन्यापासून काम करतात मात्र एक पत्रक लोकांपर्यंत पोहचले नाही. त्यामुळे काँग्रेसकडे पाच आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेऊन जाणार होते आणि ते गद्दार आहेत असे बोलणे साफ चुकीचे असल्याचेही ते म्हणाले.

राज घराण्यातील एखाद्या व्यक्तीला अशा पद्धतीने राजकारणात उतरवणे हेच मुळात चूक आहे, शाहु महाराजांचा पराभव त्यांनी स्विकारला असल्यानेच राऊतांकडून असे आरोप केले जात आहेत. संजय राऊत यांनी केलेल्या आयोध्याच्या मुद्यावरुन म्हस्के यांना छडले असता, अयोध्यामध्ये मी स्वत: एकनाथ शिंदे आणि संजय राऊत एकत्र बसलो होतो यावेळी संजय राऊत यांनी बंडाचा विषय काढत मी तुमच्या पूर्णपणे पाठीमागे आहे असे सांगितले होते असा गौप्यस्फोटही त्यांनी केला. दरम्यान म्हस्के यांची प्रचार रॅली  मीनाताई ठाकरे चौक, कॅसलमील नाका, आदर्शनगर, कोलबाड रोड, उथळसर, दादापाटील वाडी, टेकडी बंगला, चंदनवाडी शाखा आदी भागातून फिरली. त्यानंतर  धर्मवीर आनंद दिघे यांचे शक्तीस्थळ, खारटन रोड, भंडार आळी, गोखले रोड, राम मारुती रोड, गावदेवी मार्केट अशा भागातून गेली.

भाजपचा घरोघरी प्रचारठाणे शहरातील भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांचा घरा-घरांमध्ये प्रचार सुरू केला आहे. गेल्या दहा वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले कार्य, महायुतीने घेतलेले विविध निर्णय आदींची माहिती मतदारांपर्यंत देऊन पुन्हा पंतप्रधानपदी सलग तिसऱ्यांदा मोदींची निवड करण्यासाठी आवाहन केले जात आहे, अशी माहिती भाजपचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी दिली. नरेश म्हस्केंना मत म्हणजे नरेंद्र मोदींना मत, असा प्रचार केला जात असल्याचे त्यांनी नमूद केले.

 

टॅग्स :thane-pcठाणेlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४naresh mhaskeनरेश म्हस्केrajan vichareराजन विचारेEknath Shindeएकनाथ शिंदे