शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

कचऱ्यावर कोणती प्रक्रिया करणार ते सांगा - सर्वाेच्च न्यायालय

By admin | Updated: March 26, 2017 03:04 IST

डम्पिंग ग्राउंड स्थलांतरप्रकरणी मीरा-भार्इंदर महापालिकेने राष्ट्रीय हरित लवादाच्या २० कोटी रुपये एस्क्रो खात्यात जमा

भार्इंदर : डम्पिंग ग्राउंड स्थलांतरप्रकरणी मीरा-भार्इंदर महापालिकेने राष्ट्रीय हरित लवादाच्या २० कोटी रुपये एस्क्रो खात्यात जमा करण्याच्या आदेशाला स्थगिती मिळवण्यासाठी थेट सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर, शुक्रवारी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने पालिकेला रोज जमा होणाऱ्या कचऱ्यावर कोणती व कशी प्रक्रिया करणार, त्याचे प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिल्याचे विधी अधिकारी सई वडके यांनी सांगितले. उत्तनच्या धावगी-डोंगर येथील डम्पिंग ग्राउंड इतरत्र स्थलांतर करण्यासाठी स्थानिकांनी नागरी हक्क समितीच्या माध्यमातून राष्ट्रीय हरित लवादाकडे जनहित याचिका दाखल केली. त्यावर, सुरुवातीला झालेल्या सुनावणीत पालिकेने हा प्रकल्प वसई तालुक्यातील सकवार येथे स्थलांतर करणार असल्याचे लवादाच्या निदर्शनास आणून दिले होते. परंतु, तांत्रिक प्रक्रियेसह सकवार ग्रामस्थांच्या विरोधामुळे प्रकल्प सुरू होत नसल्याने स्थलांतराचा तिढा जैसे थे आहे. स्थलांतर करण्याच्या उद्देशाने लवादाने पालिकेला प्रकल्पाच्या एकूण खर्चापैकी ७० कोटींची रक्कम कोकण विभागीय आयुक्तांच्या नियंत्रणाखालील एस्क्रो खात्यात जमा करण्याचे निर्देश दिले होते. पालिकेने याविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर न्यायालयाने लवादाच्या ७० कोटी रुपये भरण्याच्या आदेशाला स्थगिती दिली. त्यामुळे पालिकेच्या आर्थिक संकटावर पडदा पडल्यानंतर पुन्हा लवादाकडे प्रकल्प स्थलांतरावर युक्तिवाद सुरू झाला. (प्रतिनिधी)