शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

न्यायालयात साक्षीदारास अश्रू अनावर

By admin | Updated: March 23, 2017 01:27 IST

तब्बल ७४ जणांचा बळी घेणाऱ्या शीळ-डायघर येथील इमारत दुर्घटनेची ठाणे न्यायालयात सुनावणीसुरू झाली असून याप्रकरणातील

ठाणे : तब्बल ७४ जणांचा बळी घेणाऱ्या शीळ-डायघर येथील इमारत दुर्घटनेची ठाणे न्यायालयात सुनावणीसुरू झाली असून याप्रकरणातील आरोपी धनदांडगे असल्याने आपल्या जीवास धोका असल्याची भीती व्यक्त करताना तक्रारदारास न्यायालयातच रडू कोसळले. या प्रकरणाची संवेदनशील पार्श्वभूमी विचारात घेऊन तक्रारदारास पोलीस संरक्षण पुरवण्याची मागणी विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी यावेळी केली.शीळ-डायघर येथील लकी कम्पाउंडमध्ये बेकायदा उभारण्यात आलेली सात मजली इमारत ४ एप्रिल २०१३ रोजी कोसळली होती. तब्बल ७४ जणांचा बळी घेणाऱ्या या दुर्घटनेप्रकरणी विकासक, पालिका अधिकारी, नगरसेवक, पोलीस कर्मचारी आणि पत्रकारांसह २७ आरोपींना अटक करण्यात आली होती. या इमारतीच्या तळमजल्यावर शरीफउद्दीन अन्सारी यांचे कपड्याचे दुकान होते. या दुर्घटनेत तेदेखील जखमी झाले होते. दुर्घटनेनंतर त्यांचा जबाब पोलिसांनी नोंदवला होता. हा जबाबच तक्रार म्हणून ग्राह्य धरून गुन्हे दाखल करण्यात आले होते. या बहुप्रतीक्षित प्रकरणाची सुनावणी ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए.एन. करमरकर यांच्या न्यायालयात बुधवारी सुरू झाली. यावेळी न्यायालयाने शरीफउद्दीन अन्सारी यांची साक्ष तपासली. शरीफउद्दीन हे या दुर्घटनेत गंभीर जखमी झाले होते. इमारतीचे बांधकाम अतिशय घिसाडघाईने करण्यात आले होते. अवघ्या ३-४ महिन्यांत संपूर्ण इमारत उभारण्यात आली होती, असे सांगून शरीफउद्दीन यांनी या प्रकरणातील पाच आरोपींची ओळख न्यायालयासमोर पटवली. याप्रकरणातील आरोपी धनदांडगे आहेत. त्यांच्यापासून आपल्या जीवाला धोका असल्याचे सांगताना शरीफउद्दीन यांना भावना अनावर झाल्या. त्यांना न्यायालयातच रडू कोसळले. विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी त्यांना धीर दिला. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन शरीफउद्दीन यांना पोलीस संरक्षण पुरवण्याची मागणी अ‍ॅड. हिरे यांनी न्यायालयास केली. आरोपींची बाजू अ‍ॅड. बाबा शेख हे मांडत असून त्यांनी साक्षीदाराची उलटतपासणी सुरू केली आहे. (प्रतिनिधी)