शहरं
Join us  
Trending Stories
1
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
2
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
3
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
4
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
5
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
6
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
7
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
8
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
9
'तुमच्या स्वार्थाचं गणित उघड झालं'; मुख्यमंत्री केलं नाही म्हणणाऱ्या अजित पवारांना आव्हाडांचे प्रत्युत्तर
10
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
11
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
12
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
13
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
14
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
15
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
16
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
17
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
18
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
19
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
20
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली

चहालाही आली दरवाढीची उकळी; गॅस, दूध भाववाढीचा फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2020 12:11 AM

चहा एक ते दोन रुपयांनी महागला

- पंकज रोडेकरठाणे : मागील सहा वर्षांत चहाचे दर वाढले नसले तरी यंदा गॅस आणि दुधाच्या दरात मोठी वाढ झाल्याने चहाचा घोट महागला आहे. गॅस सिलिंडरपाठोपाठ दुधाच्या भाववाढीमुळे चहावाल्यांनीसुद्धा भाववाढ केल्याने एक कटिंग चहामागे दोन रूपयांची वाढ केली आहे. मागील सहा वर्षांतील ही पहिलीच वाढ असल्याचा दावा चहावाल्यांकडून केला जात आहे. त्यातच, वेगवेगळ्या नावाने ब्रॅण्डिंग सुरू केलेल्या ‘अमृततुल्य’ चहाच्या दुकांनावर एका कटिंगसाठी दहा रुपये मोजणाऱ्यांची गर्दी दिसते. त्यामुळे महागाई आणि आर्थिकमंदीतही चहाचे मार्केट मात्र गरमच दिसत आहे.चहाला वेळ नसते, पण वेळेला चहा हवाच. चहा विक्री करणाºया एका कंपनीचे हे वाक्य भारतीयांसाठी चहा किती प्रेमाचा आहे याची प्रचिती देते. म्हणूनच नाक्यानाक्यावर चहाच्या टपºया दिसतात. गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत सर्वांनाच चहाची गोडी आहे. त्यामुळे या व्यवसायात कोट्यवधींची उलाढाल होते. देशात आर्थिकमंदी असो वा महागाई, चहाच्या व्यवसायावर फारसा परिणाम दिसत नाही. पूर्वी ज्या चहाची कटिंग अवघ्या पन्नास पैशाला मिळायची, ती आता दहा रुपयांवर पोहोचली आहे. तरीही चहाचे चाहते कमी झालेले नाहीत. कडक उन्हाळा असो, पावसाळा असो, वा हिवाळा, लोकांना चहा हवाच असतो. म्हणूनच रस्त्यावरची ही लहान इंडस्ट्री दिवसेंदिवस फुलतच आहे. सध्या या इंडस्ट्रीला गॅस आणि दुधाच्या भावाढीचे ग्रहण लागले आहे. गेल्या सहा महिन्यांत गॅसचे भाव गगनाला भिडले आहेत. सहा महिन्यांपूर्वी जे गॅस सिलिंडर ७००-८०० रुपयांना मिळत होते, ते आता १४२० रुपयांना मिळत आहे. जे दूध सहा महिन्यांपूर्वी ४०-४५ रुपये लिटरने मिळत होते, ते आता ६० रुपये लिटरने मिळत आहे. दूध आणि गॅसचा भाव सहा वर्षांत अनेकदा वाढला. परंतु चहाच्या कटिंगचा भाव वाढला नव्हता. आता मात्र भाववाढ करणे अपरिहार्य झाल्याचे कारण पुढे करत विक्रेत्यांनी कटिंगमागे रुपयाची वाढ केली आहे. लहान टपऱ्यांवर एरव्ही सहा रुपयांना मिळणारी कटिंग चहा आता सात रु पये झाली आहे. स्पेशल फुल चहा १८ रुपयांवरून २० रुपये झाला आहे. साधा फुल चहा १२ वरून १४ रुपये झाला आहे. भाव वाढले तरी ग्राहक कमी झाले नसल्याचे चहाविक्रेत्यांनी सांगितले.गेल्या सहा महिन्यांपासून गॅस सिलिंडरचे भाव सतत वाढत आहेत. तरीही चहाच्या भावात वाढ झालेली नव्हती. मात्र आता गॅस आणि दुधाच्या किंमतीत पुन्हा वाढ झाल्याने चहाच्या किमतीत वाढ करावी लागली. १ फेब्रुवारीपासून काही ठिकाणी भाववाढ झाली असून काही जण १ मार्चपासून भाववाढ करणार आहेत.-शंकर यादव, चहा विक्रेता, कोपरी, ठाणेगेल्या सहा महिन्यांत गॅस आणि दुधाच्या दरांमध्ये कमालीची वाढ झाली आहेसिलिंडरसहा महिन्यांपूर्वी आता800                  1420दूधसहा महिन्यांपूर्वी आता45                      60 

टॅग्स :Inflationमहागाईmilkदूध