शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

टीडीआरवरून शिवसेना-भाजपात जुंपली

By admin | Updated: March 23, 2017 01:24 IST

टीडीआर घोटाळ्यात जी बदलापूर पालिका अडचणीत सापडली, त्याच पालिकेत पुन्हा टीडीआरच्या माध्यमातून शहरातील

बदलापूर : टीडीआर घोटाळ्यात जी बदलापूर पालिका अडचणीत सापडली, त्याच पालिकेत पुन्हा टीडीआरच्या माध्यमातून शहरातील रस्ता विकसित करण्याच्या विषयाला मंजुरी घेण्यात येणार होती. मात्र, या विषयाला भाजपाने विरोध केला. त्यामुळे सभागृहात भाजपा आणि शिवसेना यांच्यात चांगलीच जुंपली. अखेर, भाजपाने या विषयाला विरोध केल्यावर शिवसेनेने भाजपाचा विरोध डावलून हा विषय मंजूर केला. बदलापूर नगरपालिकेची सर्वसाधारण सभा बुधवारी झाली. या सभेत शहरातील अनेक विकासकामांचे मुद्दे हाती घेतले होते. मात्र, त्यातील एक महत्त्वाचा विषय सभागृहात चर्चेला आला. बदलापूर येथील ज्युवेलीमधील विकास आराखड्यातील नव्या रस्त्याचे बांधकाम टीडीआरच्या माध्यमातून करण्याचा विषय मंजुरीसाठी आला. हा रस्ता बनवताना सरकारच्या निर्देशांचे पालन करून योग्य त्या निविदा प्रक्रियेतूनच रस्त्याचा विकास करण्यास शिवसेना तयार होती. मात्र, गेल्यावेळी टीडीआरमुळे अनेकजण अडचणीत आले. यामुळे टीडीआरचा विषय चुकीच्या पद्धतीने घेऊ नका, अशी भूमिका भाजपाने घेतली. यावेळी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनीटीडीआरच्या माध्यमातून रस्ता कशा पद्धतीने विकसित केला जाईल, याचा खुलासा सभागृहात केला. तसेच सहायक नगररचनाकार सुदर्शन तोडणकर यांनीही या रस्त्याचे काम नियमानुसारच केले जाईल, असे स्पष्ट केले. मात्र, भाजपाचे गटनेते राजेंद्र घोरपडे यांनी मात्र टीडीआरच्या माध्यमातून जो विषय मंजुरीसाठी आणला आहे, तो चुकीचा असून या विषयासोबत प्रशासनाची टिप्पणी आणि एडीटीपी विभागाचा अभिप्राय सोबत जोडणे गरजेचे होते, असे स्पष्ट केले. अभिप्राय नसताना परस्पर या विषयाला आम्ही मंजुरी देणार नाही, अशी भूमिका घोरपडे यांनी घेतली. यावरून म्हात्रे आणि घोरपडे यांच्यात जुंपली. अखेर, भाजपाने या विषयाला विरोध करत नियमानुसार हा विषय आल्यावर आम्ही मंजुरी देऊ, असे सांगितले. शिवसेनेने हा विषय नियमानुसार असून त्याला आमची मंजुरी असल्याचे स्पष्ट केले. (प्रतिनिधी)