शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

ठामपाने सहा महिन्यांत केल्या २.२१ लाख कोरोना चाचण्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2020 00:20 IST

एकूण रुग्ण ३२ हजार : रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ८६ टक्के

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठाणे महापालिकेने शहराच्या विविध भागांत सुरू केलेल्या कोरोना चाचणी केंद्रांत गेल्या सहा महिन्यांत दोन लाख २१ हजार चाचण्या केल्या असून, त्यातील केवळ ३२ हजार ८२ जणांना त्याची लागण झाल्याचे निदान झाले आणि ९३० जणांचा मृत्यू झाला. शहरातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे ८६ टक्के असल्याने इतर शहरांच्या मानाने ठाणे शहरातील कोरोना नियंत्रणात असल्याचे दिसत आहे.

ठाणे शहरात मार्च महिन्यात पहिला रु ग्ण आढळला होता. वेळीच कठोर उपाययोजना न आखल्याने शहरात दिवसागणिक कोरोनाबाधितांसह मृत्यूंच्या संख्येत वाढ होत असल्याचे दिसून येत होते. यावर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका आयुक्त व सर्व अधिकाऱ्यांशी झालेल्या बैठकीत नाराजी व्यक्त केली होती. तसेच शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना आखण्याच्या सूचना केल्या होत्या. याची गांभीर्याने दाखल घेऊन ठाणे महापालिकेने मोठ्या प्रमाणात चाचण्या वाढविल्या आहेत. यामुळे नवे रु ग्ण आढळण्याच्या प्रमाणात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. असे असले तरी, गेल्या सहा महिन्यांपासून ठाणे महानगरपालिका कोरोनावर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करीत आहे. सद्य:स्थितीत ठाणे महानगरपालिका घरोघरी जाऊन लोकांच्या चाचण्या करण्यावर भर देत आहे. ठिकठिकाणी आरोग्य शिबिरे राबवित आहेत. अ‍ॅण्टिजन चाचणीवर भर दिला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषित केलेल्या ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या अभियानाला ठाणे महानगरपालिकेने जोमाने सुरु वात केली आहे. परिणामी, सद्य:स्थितीला रोज सुमारे पाच ते सहा हजार नागरिकांची कोविड चाचणी केली जात आहे. अ‍ॅण्टिजन आणि स्वॅब चाचण्या केल्या जात आहेत. त्यातील सरासरी ३०० ते ४०० नागरिक हे पॉझिटिव्ह आढळत आहेत. तर उपचारासाठी दाखल झालेले सरासरी ८६ टक्के रु ग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस