शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

स्वा. सावरकर साहित्य संमेलनाध्यक्षपदी रमेश पतंगे

By admin | Updated: March 21, 2017 01:54 IST

ग्रंथदिंडी, परिसंवाद, भाषणे, सांस्कृतिक कार्यक्रमांनी एकोणतिसावे स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलन २१ ते २३ एप्रिलदरम्यान

ठाणे : ग्रंथदिंडी, परिसंवाद, भाषणे, सांस्कृतिक कार्यक्रमांनी एकोणतिसावे स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलन २१ ते २३ एप्रिलदरम्यान ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे रंगणार आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे सामाजिक, साहित्यिक आणि राष्ट्रनिष्ठेशी निगडित विचार आणि विश्व या संमेलनाच्या माध्यमातून उलगडले जाणार आहे. राजकीय आणि सामाजिक चळवळीचे अभ्यासक रमेश पतंगे यांची या संमेलनाध्यक्षपदी निवड झाली आहे.स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य अभ्यास मंडळ, सावरकर दर्शन प्रतिष्ठान, मुंबई आणि स्वा. वि.दा. सावरकर प्रतिष्ठान, ठाणे यांच्या वतीने हे संमेलन यंदा ठाण्यात आयोजिले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जन्मशताब्दी वर्षापासून हे साहित्य संमेलन आयोजिले जाते. यंदाचे वर्ष सावरकर साहित्य अभ्यास मंडळाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. या सुवर्ण महोत्सवी वर्षात ठाण्यात होऊ घातलेल्या एकोणतिसाव्या संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून ठाणे जनता सहकारी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील साठे यांची निवड झाली आहे, अशी माहिती अभ्यास मंडळाचे अध्यक्ष शंकर गोखले यांनी दिली. संमेलनाची सुरुवात २१ एप्रिलला सायंकाळी ४ ते ५ या वेळेत ग्रंथदिंडीच्या माध्यमातून होणार आहे. ५ ते ७ या वेळेत मुख्य उद्घाटन सोहळा पार पडेल. तीन दिवसांत ४ परिसंवाद, २ भाषणे आणि २ सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. ‘भारताची सर्वांगीण संरक्षण सिद्धता’, ‘गेल्या १०० वर्षांत देशात सामाजिक सुधारणांचे झालेले प्रयत्न’, ‘सावरकरांवरील आक्षेप व त्याचे निराकरण’ आणि ‘सावरकरांची साहित्यसंपदा’ या चार विषयांवर परिसंवाद होणार आहेत. तर, ‘न उमगलेले सावरकर’ आणि ‘आजच्या संदर्भात सावरकर’ या विषयावर शंतनू विखे आणि विक्रम हेडगे हे भाषण करणार आहेत. तर, २३ एप्रिलला सायंकाळी ५ वाजता या संमेलनाचा समारोप कार्यक्रम होईल. या संमेलनात देशभरातून सावरकरप्रेमींसह विविध संस्था सहभागी होतील. (प्रतिनिधी)