शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

एकाच दिवशी १२ सफाई कर्मचारी निलंबित, मुख्याधिकाऱ्यांची कारवाई

By admin | Updated: October 19, 2015 01:00 IST

अंबरनाथ नगरपरिषदेच्या हजेरी शेडला अचानक भेट देऊन नव्याने नियुक्त झालेल्या मुख्याधिकाऱ्यांनी हजेरी शेडचा गोंधळ उघड केला आहे. तसेच जे कर्मचारी कायमच गैरहजर आहेत

अंबरनाथ : अंबरनाथ नगरपरिषदेच्या हजेरी शेडला अचानक भेट देऊन नव्याने नियुक्त झालेल्या मुख्याधिकाऱ्यांनी हजेरी शेडचा गोंधळ उघड केला आहे. तसेच जे कर्मचारी कायमच गैरहजर आहेत, त्या १२ कर्मचाऱ्यांवर लागलीच निलंबनाची कारवाई केली आहे. मुख्याधिकाऱ्यांच्या या निर्णयामुळे सफाई कर्मचारी चांगलेच धास्तावले आहेत. अंबरनाथ नगरपरिषदेतील अनेक सफाई कर्मचारी हे कामावर नसतानाही त्यांची हजेरी नियमित लागते. तसेच अनेक कर्मचारी हे नियमित गैरहजर असतांनाही त्यांच्यावर कोणतीच कारवाई होत नाही. यासंदर्भात वारंवार तक्रारी करूनदेखील संबंधित कर्मचाऱ्यांवर कोणतीच कारवाई केली जात नाही. अंबरनाथ पालिकेत ५७४ सफाई कर्मचारी असून त्यातील बहुसंख्य कर्मचारी हे हजेरी लावून दुसरीकडे कामावर जातात. तर, काही कामगार कामावर असताना रिक्षा चालविणे आणि भाजी विक्री करणे, अशी कामे करत असतात. त्यामुळे प्रभागात साफसफाईचे काम नियमित होत नाही. कर्मचाऱ्यांच्या या कामचुकारपणाला संबंधित विभागाचे अधिकारीदेखील साथ देतात. कर्मचारी आणि अधिकारी यांच्यातील संगनमतामुळे कर्मचारी प्रभागात काम न करता खाजगी कामे करतात. सफाई कर्मचाऱ्यांच्या या गैरवर्तनाची माहिती मुख्याधिकारी गणेश देशमुख यांना मिळताच त्यांनी शुक्रवारी आणि शनिवारी शहरातील सर्व हजेरी शेडची चाचपणी केली. त्यात त्यांना ९६ कर्मचारी हे गैरहजर असल्याचे आणि १२ कर्मचारी हे कामावर येतच नसल्याचे निदर्शनास आले. मुख्याधिकाऱ्यांनी या १२ कर्मचाऱ्यांना लागलीच निलंबित केले. तर, ९६ कर्मचाऱ्यांचा एक दिवसाचा पगार कापून त्यांना नोटीस बजावली आहे. ज्या कर्मचाऱ्यांची तब्येत ठीक नाही, अशा कर्मचाऱ्यांना शासकीय रुग्णालयातील दाखला आणण्याचे आदेश काढले आहेत.