शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
3
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
4
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
5
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
6
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
7
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
8
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
9
शांतीदूत बनायला गेला अन् स्वत:च तोंडावर पडला; अमेरिकेने पाकिस्ताची दोन जहाजे होर्मुझमधून हाकलली!
10
​परतवाडा अश्लील व्हिडिओ कांड : तपासासाठी ४७ जणांची एसआयटी मैदानात; आरोपींची संख्या वाढणार 
11
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
12
₹६०८ कोटींची ऑर्डर मिळताच सुस्साट पळाला 'हा' शेअर; जोरदार तेजी, तुमच्याकडे आहे का?
13
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
14
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
15
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
16
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
17
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
18
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
19
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
20
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरमध्ये डेंग्यूने मुलाचा मृत्यू?

By admin | Updated: September 8, 2016 02:50 IST

शहरात ताप आणि डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. तापाचे १७००, डेंग्यूचे संशयित ३८, तर मलेरियाच्या ४१ रुग्णांची पालिकेकडे नोंद झाली आहे.

उल्हासनगर : शहरात ताप आणि डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. तापाचे १७००, डेंग्यूचे संशयित ३८, तर मलेरियाच्या ४१ रुग्णांची पालिकेकडे नोंद झाली आहे. दरम्यान, डेंग्यूने साहिल भालेराव (१७) या मुलाचा मृत्यू झाला. उपचारात हलगर्जीपणा करणाऱ्या रुग्णालयावर कारवाईची मागणी कुटुंबाने केली आहे. उल्हासनगरमध्ये नियमित कचरा उचलला जात नाही. परिणामी, कचऱ्याचे ढीग साचून दुर्गंधी पसरली आहे. ताप व डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचा आरोप शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी करत कारवाईची मागणी आयुक्तांकडे केली आहे. पालिकेच्या आरोग्य विभागाकडे जानेवारीपासून तापाचे १७००, तर डेंग्यूच्या ३८ रुग्णांची नोंद झाली आहे. रुग्णालयात खाटा मिळत नसल्याने रुग्णांना जमिनीवर झोपण्याची वेळ आल्याची माहिती मध्यवर्ती रुग्णालयाचे जिल्हा चिकित्सक डॉ. अशोक नंदापूरकर यांनी दिली.शहरातील कॅम्प नं.-४ दहाचाळ विभागात राहणाऱ्या साहिलला ताप आल्यानंतर प्राथमिक उपचारासाठी खाजगी दवाखान्यात नेले. दुसऱ्या दिवशी रामरक्षा रुग्णालयात दाखल केल्यानंतरही तब्येतीत सुधारणा न झाल्याने चार दिवसांनी एम्स रुग्णालयात नेले. उपचारादरम्यान साहिलचा मृत्यू झाला. त्याच्या पालकांसह कुटुंबांनी साहिलवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी हलगर्जीपणा केल्याचा आरोप केला आहे. ताप व डेंग्यूची साथ आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य विभागाने जनजागृती केली. तसेच औषधांची खरेदी करून आरोग्य केंद्रासह रुग्णालयात पुरवण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. राजा रिजवानी यांनी दिली. १५ दिवसांत डेंग्यूचे संशयित १६ रुग्ण आढळले. त्यांच्यावर विविध रुग्णालयांत उपचार करून घरी सोडून दिले, असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)