- सदानंद नाईकउल्हासनगर - कॅम्प नं-४ येथील मार्केट मध्ये बुधवारी दुपारी साडे सहा फुटाचा नाग मेडिकल दुकानात मिळाल्याने, नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. तर माणेरेगावात मंगळवारी ७ फुटाचा अजगर मिळाला असून सर्प मित्रानी दोन्ही सापना पकडून नैसर्गिक अधिवासामध्ये सोडले.
उल्हासनगर कॅम्प नं-४ येथील मार्केटच्या मुख्य रस्त्यावर बुधवारी दुपारी १ वाजता साडे सहा फुटाचा नाग नागरिकांना दिसताच पळापळी सुरू झाली. सापाने शेजारील मेडिकल मध्ये आश्रय घेतल्यावर नागरिकांनी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष जगदीश तेजवानी यांना फोन करून घटनेची माहिती दिली. तेजवानी यांनी सर्प मित्राला फोन करून मार्केट मध्ये साप निघाल्याचे सांगून बोलावून घेतले. सर्प मित्राने मेडिकल मधून सापाला पकडून नैसगिक आदिवास क्षेत्रात सोडून दिले. भर मार्केट मध्ये साप निघाल्याने, आश्चर्य व्यक्त होत आहे. तसेच शेजारील माणेर गावात मंगळवारी रात्री ७ फुटाचा अजगर मिळून आला असून सर्प मित्रानी अजगरला पकडून नैसर्गिक आदिवासी क्षेत्रात सोडून देण्यात आले. साप नागरी वस्तीत व मार्केट मध्ये येत असल्याने, शासनाने याला प्रतिबंध घालण्याची मागणी होत आहे.
Web Summary : A six-and-a-half-foot snake was found in an Ulhasnagar market, causing panic. Simultaneously, a seven-foot python was discovered in Maneregaon. Snake rescuers captured both reptiles and released them into their natural habitat. Residents are demanding preventative measures against snakes entering residential areas.
Web Summary : उल्हासनगर के बाजार में साढ़े छह फीट का सांप मिलने से दहशत फैल गई। वहीं, माणेरगाँव में सात फीट का अजगर मिला। सर्प मित्रों ने दोनों को पकड़कर प्राकृतिक आवास में छोड़ा। निवासियों ने रिहायशी इलाकों में सांपों के प्रवेश को रोकने की मांग की है।