शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

वायुप्रदूषणाचे ‘स्लो पॉयझनिंग’ घातक

By admin | Updated: November 17, 2016 06:57 IST

मागील आठवड्यात दिल्लीतील वाढलेल्या प्रदूषणाचा मुद्दा देशभर गाजला. मात्र, एमएमआर रिजनमध्ये सध्या प्रचंड वेगाने विकसित होत

मुरलीधर भवार / कल्याणमागील आठवड्यात दिल्लीतील वाढलेल्या प्रदूषणाचा मुद्दा देशभर गाजला. मात्र, एमएमआर रिजनमध्ये सध्या प्रचंड वेगाने विकसित होत असलेल्या ठाणे जिल्ह्यातील बहुतांश परिसरात धुलीकणांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे लोकांना श्वास कोंडण्याचा त्रास होतो. वेळीच या समस्येवर उपाय केले नाहीत, तर या स्लो पॉयझनमुळे या परिसरातील लोकांचे आयुर्मान कमी होत जाणार असल्याचे जाणकारांचे मत आहे.ठाणे, दिवा, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, कल्याण-शीळ रोड, कल्याण-भिवंडी, शीळ, ठाणे-शीळ या परिसरात धुलीकणांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे नागरिकांना श्वसनाच्या आजारांचा सामना करावा लागत आहे. ठाणे-कल्याण मार्गावर रेल्वे प्रवास करताना दिवा स्थानक येताच प्रवाशांचा श्वास गुदमरू लागतो. दिवा परिसरातील डम्पिंग ग्राउंडवर दररोज कचरा जाळण्यात येतो. त्यामुळे हा परिसर रात्रीच्या वेळी धुराने वेढलेला असतो. आता थंडीला सुरुवात झाली आहे. पहाटे धुक्याचे प्रमाण जास्त असते. या धुक्याचा गैरफायदा घेत कचरा जाळल्याने धुराचे लोट हवेत जातात. धुके आणि धूर याबाबत दिवावासीयांचा संभ्रम होतो. कचरा जाळण्यावर कोणत्याही सरकारी यंत्रणांचे नियंत्रण नाही. त्याचप्रमाणे ठाणे जिल्ह्यातील विविध दगडखाणींमधील क्रशरमुळे वातावरणात धुलीकणांचे प्रमाण वाढते आहे. कल्याण-शीळ रस्त्यावर धुळीचे प्रमाण इतके आहे की, दुचाकीवरील प्रवासी महिला व पुरुष तोंडाला स्कार्फ बांधल्याखेरीज प्रवास करू शकत नाहीत. डोंबिवलीतील औद्योगिक वसाहतीमधील कारखानेही धुक्याचा फायदा घेऊन प्रचंड प्रमाणात विषारी वायू सोडतात. रासायनिक कंपन्या योग्य प्रक्रिया न करतासांडपाणी नाल्यात सोडतात. त्याचा दर्प इतका भयानक असतो की, त्यामुळेही नागरिकांना त्रास होतो. डोंबिवली, उल्हासनगर आणि अंबरनाथ परिसरात ही समस्या तीव्र आहे. केडीएमसीच्या हद्दीत आधारवाडी डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न ३५ वर्षांपासून गाजत आहे. हे डम्पिंग ग्राउंड बंद करण्यात अद्याप महापालिकेस यश आलेले नाही. या डम्पिंगचा उग्र, घाण वास कल्याण स्टेशन परिसरापर्यंत येत असतो. तसेच डम्पिंगच्या दुर्गंधीने नागरिक नाक मुठीत धरून वास्तव्य करीत आहेत. डम्पिंगवर लागलेल्या आगीचा धूर नागरिकांच्या नाकातोंडात जातो. डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न कल्याण, डोंबिवली, दिव्याबरोबर भिवंडीतही आहे. तेथेही डम्पिंगची व्यवस्था नाही. उल्हासनगर महापालिकेने व अंबरनाथ-बदलापूर पालिकांनीही डम्पिंग ग्राउंडवरील कचऱ्यावर शास्त्रोक्त प्रक्रियेचा प्रकल्प उभारलेला नाही. वालधुनी नाल्यात रासायनिक सांडपाणी सोडले जाते. त्या पाण्याचा उग्र दर्प अंबरनाथ, उल्हासनगर आणि कल्याणच्या नागरिकांना सहन करावा लागतो. तोच प्रकार डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्यगृहाजवळून वाहणारा नाला खंबालपाडामार्गे ठाकुर्ली रेल्वेमार्गाखालून कल्याण खाडीत मिळतो, तेथेही आहे.