सात कोटींच्या मालमत्तेच्या वादातून बहिणीचा शिरच्छेद, आईवरही केला हल्ला; नालासोपारा हादरले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2026 06:05 IST2026-02-25T06:03:32+5:302026-02-25T06:05:44+5:30

Nalasopara Crime news: संतापात आरोपी अजित याने बहिणीवर कोयत्याने सपासप वार केले. त्यानंतर त्याने तिचा शिरच्छेद केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.

Sister beheaded over property dispute worth Rs 7 crore, mother also attacked; Nalasopara shaken | सात कोटींच्या मालमत्तेच्या वादातून बहिणीचा शिरच्छेद, आईवरही केला हल्ला; नालासोपारा हादरले

सात कोटींच्या मालमत्तेच्या वादातून बहिणीचा शिरच्छेद, आईवरही केला हल्ला; नालासोपारा हादरले

नालासोपारा : नालासोपारा पूर्वेकडील टाकीपाडा येथील सर्वोदय वसाहतीत भावाने बहिणीचा कोयत्याने हल्ला करून शिरच्छेद केला. ही धक्कादायक घटना मंगळवारी पहाटे घडली. वाद सोडविण्यासाठी गेलेल्या आईवरही त्याने हल्ला केला असून, ती गंभीर जखमी आहे. सात कोटींच्या संपत्तीच्या वादातून ही हत्या झाली.

सुप्रिया कानडे (३५) आणि भाऊ अजित मालुष्टे (४०) यांच्यात संपत्तीच्या कारणामुळे पहाटे वाद झाला. यावेळी संतापात आरोपी अजित याने बहिणीवर कोयत्याने सपासप वार केले. त्यानंतर त्याने तिचा शिरच्छेद केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.

आईने सुप्रिया हिला वाचविण्याचा प्रयत्न करताच, आरोपीने तिच्यावरही हल्ला केला. त्याही त्या गंभीर जखमी असून, महापालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तुळींज पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन आरोपीला अटक केली. आरोपीने सुरुवातीला मानसिक आजाराने त्रस्त असल्याचा बनाव केला होता.

शहरात भीतीचे वातावरण

वसई-विरारमध्ये सलग घडणाऱ्या हत्यांमुळे कायदा सुव्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. काही दिवसांपूर्वी वसईत एका अल्पवयीन मुलाने आपल्या आत्याची हत्या केल्याची घटना घडली होती.

नालासोपाऱ्यात भररस्त्यात झालेल्या टोळी संघर्षात एका तरुणाचा मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर भावाने बहिणीची निघृण हत्या केल्याची घटना घडल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण आहे.

टाकीपाडा येथील हत्या प्रकरणातील आरोपी अजित मालुष्टे हा मनोरुग्ण नाही. त्याने तसा बनाव केला होता. तो नोकरी-व्यवसाय करीत नसून बहीण घरचा खर्च करीत होती. सात कोटींच्या जागेच्या वादामुळे ही हत्या झाली आहे. -पौर्णिमा चौगुले श्रींगी, पोलिस उपायुक्त, परिमंडळ दोन

Web Title : संपत्ति विवाद में बहन का सिर काटा; नालासोपारा में मां पर भी हमला।

Web Summary : नालासोपारा में संपत्ति विवाद के चलते एक भाई ने अपनी बहन का सिर काट दिया और अपनी मां पर भी हमला कर दिया। माँ गंभीर रूप से घायल हैं। आरोपी ने पहले मानसिक रूप से बीमार होने का नाटक किया, लेकिन पुलिस ने पुष्टि की कि हत्या संपत्ति विवाद से प्रेरित थी, जिससे शहर में डर फैल गया।

Web Title : Sister beheaded over property dispute; mother attacked in Nalasopara.

Web Summary : In Nalasopara, a brother beheaded his sister over a seven-crore property dispute, also attacking their mother. The mother is critically injured. The accused initially feigned mental illness but police confirmed the murder was motivated by property conflict, sparking fear in the city.