शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
2
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
3
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
4
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
5
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
6
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
7
Latest Marathi News LIVE Updates: भाजपाने मतदारसंघ पुनर्रचना केलेल्या अधिकाऱ्यांनाच नोकरीवर घेतले, रोहित पवारांचा आरोप
8
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
9
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
10
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
11
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
12
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
13
सोलापूर-पुण्याहूनही सुटणार पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन? जाणून घ्या, कुठे जाणार अन् थांबणार!
14
चीनने इराणला पाठवले मिसाईल्ससाठीचे केमिकल्स, अमेरिकेने पकडलेल्या जहाजात सापडला साठा; निक्की हेलींचा दावा
15
माजी क्रिकेटपटू, तृणमूल खासदार युसूफ पठाणचे सासरे आणि मेहुण्याला अटक, मुंबई पोलिसांनी केली कारवाई
16
अरे बापरे! मोमोज खाणं ठरलं जीवघेणं; १० वर्षांच्या मुलीचं लिव्हर फेल, आठवेना, चालताही येईना
17
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या कोट्यवधीच्या प्रॉपर्टीवर येणार तात्पुरती टाच; 'अशी' होणार कुटुंबियांची अडचण
18
MHADA Lottery: गिरणी कामगारांच्या २,५२१ घरांच्या लॉटरीला विलंब लागण्याची चिन्हे 
19
जिनिलियाचं रितेशवरील प्रेम पाहून भारावली भाग्यश्री, 'राजा शिवाजी' सेटवरचा किस्सा सांगत म्हणाली...
20
उरणमधील नियोजित ८५० मेगावॅटचा प्रकल्प रखडला, केंद्राकडे गॅस पुरवठ्याचा प्रस्ताव धूळखात पडून
Daily Top 2Weekly Top 5

नोटाबदलीचा साधा सोपा फॉर्म्युला

By admin | Updated: December 29, 2016 02:34 IST

आपली रोजची गरज काय असते? दूध, भाजी आणि इतर काही छोट्या-मोठ्या गोष्टी. पण यासाठी बँकेत आपण पैसे काढण्यासाठी तासन्तास उभे राहतो. त्यापेक्षा यावर

ठाणे : आपली रोजची गरज काय असते? दूध, भाजी आणि इतर काही छोट्या-मोठ्या गोष्टी. पण यासाठी बँकेत आपण पैसे काढण्यासाठी तासन्तास उभे राहतो. त्यापेक्षा यावर काही सोपा मार्ग काढता येऊ शकतो का? असा विचार ठाण्यातील एका ६७वर्षीय वृद्धाने केला आणि यातून त्यांनी एक साधा सरळ फॉर्म्युला शोधून काढला. एखाद्या किराणा मालाच्या दुकानात जाऊन सामान घेतल्यानंतर किंवा मॉलमध्ये जरी सामान घेतले आणि त्या ठिकाणी ३०० रुपयांचे बिल झाले असेल तर ३५०चे बिल देऊन त्यांच्याकडून ५० रुपये परत घ्यावेत ज्यामुळे बँकेच्या रांगेत उभे राहण्याचा त्रास वाचेल. हा फॉर्म्युला आत्मसात केला किंवा नागरिकांना त्या दृष्टीने मदत केली तर याचा नक्कीच फायदा दोघांनाही होईल असा विश्वास या वृद्धाने व्यक्त केला आहे.ठाण्यातील वृंदावन येथील दिलीप करकरे (६७) या वृद्धाने हा फॉर्म्युला शोधून काढला आहे. दोन वर्षांपूर्वी त्यांनी एका दुकानातून स्वॅप करून औषधे घेतली होती. परंतु त्यांना सुट्या पैशांची चणचण होती, त्या वेळेस त्यांनी दुकानदाराकडे जास्तीचे पैसे स्वॅप करून शिल्लक राहिलेली रक्कम त्यांच्याकडून घेतली. हाच अनुभव गाठीशी असल्याचा फायदा झाल्याचे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. आपली रोजची गरज ती केवढी असते? बुट पॉलीश, दूध, भाजी आणि इतर काही खाण्याचे पदार्थ आपण विकत घेत असतो. परंतु काही ठिकाणी कार्ड स्वॅप करण्याची सुविधा असते तर काही ठिकाणी ही सुविधा उपलब्ध नसते. त्यात आता नोटाबंदीमुळे या वस्तू घ्यायच्या कशा, असा प्रश्न पडलेला आहे. कारण दुकानदारदेखील सुटे पैसे देणार कुठून? त्यामुळे सगळ्यांचे वांदे झाले आहेत. परंतु मी जी क्लृप्ती वापरली त्याचा मला खूप फायदा झाला आहे. या नव्या कल्पनेमुळे दुकानदाराबरोबर आपलाही फायदा होतो. दुकानदाराला त्याचे पैसे कार्डद्वारे मिळतात आणि आपल्याला पैसे सुटे करण्यासाठी बँकेत जाण्याची किंवा सुट्या पैशांसाठी एटीएमबाहेर लांबच लांब रांगेत उभे राहण्याची वेळ येत नाही. (प्रतिनिधी)- विशेष म्हणजे करकरे यांनी जुन्या नोटा बंद झाल्या तेव्हा घरातील सुटे पैसे शोधण्यास सुरुवात केली असता त्यांना त्याच्या घरात हजोरा रुपये सापडले. परंतु त्यांनी या सुट्या पैशांचा वापर केवळ स्वत:साठी न करता आपल्या मित्रमंडळी आणि गरजूंनादेखील त्या पैशाचे वाटप केले.