शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! ठाण्यात मोबाईल चोरटयाशी झालेल्या झटापटीत रिक्षातील प्रवासी महिलेचा मृत्यु

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2021 22:22 IST

मोबाईलची चोरटयाशी प्रतिकार करतांना कळवा रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेतून पडून ३१ वर्षीय प्रवासी महिलेचा मृत्यु झाल्याची घटना ताजी असतांनाच आता रिक्षा प्रवासा दरम्यान ठाण्यातील कन्मीला रायसींग (२७) महिलेलाही अशाच प्रकारे बुधवारी रात्री जीव गमवावा लागला आहे.

ठळक मुद्देनौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हादोघांना भिवंडीतून अटक

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: मोबाईलची चोरटयाशी प्रतिकार करतांना कळवा रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेतून पडून ३१ वर्षीय प्रवासी महिलेचा मृत्यु झाल्याची घटना ताजी असतांनाच आता रिक्षा प्रवासा दरम्यान ठाण्यातील कन्मीला रायसींग (२७) महिलेलाही अशाच प्रकारे बुधवारी रात्री जीव गमवावा लागला आहे. चोरटयाकडून तिचा मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न सुुरु असतांनाच ती खाली पडून गंभीर जखमी झाली. त्यातच तिचा मृत्यु झाला. या प्रकरणी नौपाडा पोलिसांनी गुरुवारी दोघांना अटक केल्याची माहिती सूत्रांनी दिली.मुंबईत राहणारी लालचुरसांगी फॅन्चुन (३०, रा. कलीना, सांताक्रुझ) ही तिची मैत्रीण कन्मीला हिच्यासह ठाण्यातील विवियाना मॉल येथून ९ जून रोजी रात्री ७.५० वाजण्याच्या सुमारास नाशिक मुंबई पूर्व द्रूतगती मार्गावरील तीन हात नाका येथील ओपन जीम जवळील रस्त्याने मुंबईकडे रिक्षातून जात होत्या. त्याचवेळी एका मोटारसायकलवरुन दोघेजण त्यांचा पाठलाग करीत आले. त्यांच्यापैकी दोघांनीही रेनकोट घातलेला होता. त्याचवेळी पाठीमागे बसलेल्याने कन्मीला हिच्या हातातील मोबाईल जबरीने हिसकावून पळण्याचा प्रयत्न केला. हा हिसका इतका जोरदार होता की, हा मोबाईल त्याच्याकडून हिसकावण्याचा प्रयत्न सुरु असतांना ती तोल जाऊन खाली कोसळली. यात डोक्याला मार लागून ती गंभीर जखमी झाली. तिला तातडीने जवळच्याच एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तासाभरानेच तिचा मृत्यु ओढवला. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले आणि निरीक्षक रवींद्र क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक मनोहर सोनवणे आणि उपनिरीक्षक विनोद लभडे यांच्या पथकाने भिवंडीतून गुरुवारी अल्केश परवेझ मोमीन अन्सारी (२०) आणि सोहेल अन्सारी (१८, रा. दोघेही भिवंडी) या दोघांना तांत्रिक विश्लेषण आणि खबऱ्यांच्या आधारे अटक केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेRobberyचोरीMaharashtraमहाराष्ट्र