विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2025 13:02 IST2025-07-13T13:01:43+5:302025-07-13T13:02:40+5:30

विरारमध्ये एका मराठी माणसासोबत हुज्जत घालणाऱ्या परप्रांतीय रिक्षाचालकाला शिवसैनिकांनी चोप दिला.

Shiv Sena workers beat up Marathi-hating rickshaw puller in Virar | विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले

विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले

नालासोपारा - राज्यात सध्या मराठी-हिंदी वाद सुरु असून मुंबईत परप्रांतियांची मुजोरी पाहायला मिळत आहे. मुंबईमध्ये मराठी माणसांना मारहाण केल्याचे धक्कादायक प्रकार वारंवार समोर येत आहेत. दोन दिवसांपूर्वी विरारमध्ये मुजोर परप्रांतीय रिक्षाचालकाने एका दुचाकीस्वाराला दमदाटी केली होती. या मराठीद्वेष्ट्या रिक्षाचालकाला आता शिवसैनिकांनी  चांगलाच चोप दिला. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

राजू पटवा असे या मुजोर रिक्षाचालकाचे नाव असून त्याच्या सोबत वाद झालेला अस्सल मराठीत बोलणारा व्यक्ती.भावेश पडोलीया हा स्वत: परप्रांतीय उत्तर प्रदेश, झाशी येथला असून महाराष्टाला आपली कर्मभूमी मानणारा आहे.

राजू पटवा या रिक्षा चालकाला विरार स्टेशन परिसरात भर रस्त्यात शिवसेना कार्यकर्त्यांनी चोप दिला आहे. शिवाय ज्या भावेश पडोलीया आणि त्याच्या बहिणीला धक्का बुक्की केली होती. त्यांची माफी मागायला लावली. 

त्याचप्रमाणे महाराष्ट्र, मराठी भाषा आणि महापुरुषांची देखील माफी मागायला लावली. या वेळी मराठी भाषा, महाराष्ट्र आणि मराठी माणसाबाबत अपनास्पद बोलल्यास त्याला शिवसेना स्टाईलने उत्तर देणार असे विरार शहर प्रमुख उदय जाधव यांनी ठणकावलं आहे. यावेळी शिवसेनेच्या महिला कार्य कार्यर्त्यांसह मोठया संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

दोन दिवसांपूर्वी भावेश पडोलीया या दुचाकीस्वार तरुणाने रिक्षा चालकाने चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक केल्याचा जाब मराठीतून विचारल्याने रिक्षाचालकाने त्याला हिंदीमध्ये बोलण्याची  सक्ती करत त्याला आणि त्याच्या बहिणीला धक्काबुक्की  केली होती.

मुळचा उत्तर प्रदेशमधील रहिवासी भावेश पडोलीया हा मराठीत बोलत असताना मुजोर रिक्षाचालक राजू पटवा याने  हिंदी बोलण्याची सक्ती केली होती.

Web Title: Shiv Sena workers beat up Marathi-hating rickshaw puller in Virar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.